देवगडात रोटरी क्लबतर्फे 
मुलांना शालेय साहित्य

देवगडात रोटरी क्लबतर्फे मुलांना शालेय साहित्य

Published on

१९०८६


देवगडात रोटरी क्लबतर्फे
मुलांना शालेय साहित्य
देवगड ः येथील रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या वतीने प्राथमिक सडा शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये वही, छत्री, स्कूल बॅग, चार्जिंग बल्ब आदी शालोपयोगी वस्तूंचा समावेश होता. अशोक मजुमले यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रवीण पोकळे, सचिव विजय बांदिवडेकर, खजिनदार अनिल कोरगावकर, माजी अध्यक्ष हनिफ मेमन, श्रीपाद पारकर, मनस्वी घारे, संजय धुरी, अनिल गांधी आदींसह प्रशालेकडून सचिन जाधव, मुख्याध्यापिका राजश्री मोंडकर, मृण्मयी मुणगेकर आदी उपस्थित होते. सुमारे ८० पटसंख्या असणाऱ्‍या या शाळेत सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक वही देण्यात आली. शालेय साहित्याचे वाटप केल्याने विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले.

दोडामार्ग ज्येष्ठ नागरिक
संघाची सोमवारी सभा
दोडामार्ग ः सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, दोडामार्ग शाखेची मासिक सभा सोमवारी (ता. ३१) सकाळी १०.३० वाजता शरद मणेरीकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. सभासदांनी या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिनकर उगवेकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.