साखरपा गोवरेवाडी रस्ता पावसानंतर बांधणार

साखरपा गोवरेवाडी रस्ता पावसानंतर बांधणार

Published on

rat26p52.jpg
19070
साखरपाः रस्त्याची पाहणी करताना अधिकारी आणि जयसिंग माने.

साखरपा गोवरेवाडी
रस्ता पावसानंतर बांधणार
साखरपा, ता. २६ः साखरपा गोवरेवाडी नवीन रस्ता पावसाळ्यानंतर हायवे विभाग बांधून देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरून साखरपा-गोवरेवाडी मार्गाची मिऱ्या नागपूर चौपदरीकरण कामामुळे पूर्णपणे दुरवस्था झाली होती. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ठेकेदाराने केलेल्या खोदाईमुळे रस्त्यासह डोंगराला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा मार्ग पावसाळ्यापासून बंद आहे. यामुळे विद्यार्थी, वाडीतील नागरिक, आजारी रुग्ण यांचे भयंकर हाल होत आहेत. ही सर्व बाब ग्रामस्थांनी हायवे विभाग व ठेकेदार यांना दाखवली होती; मात्र त्याला त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यांनतर ही बाब गोवरेवाडी ग्रामस्थांनी सभापती जया माने यांच्या कानावर घातली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थ, अधिकारी यांच्यासह पाहणी करत आक्रमक भूमिका घेत दुसरा सुरक्षित रस्ता बांधून द्यावा, अशी भूमिका घेतली. यानंतर खासदार विनायक राऊत यांना कळवले. खासदार राऊत यांनी रस्ता सुरक्षा बैठकीत यावर प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्याचप्रमाणे लांजा-राजापूर आमदार राजन साळवी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून अधिकाऱ्यांना यावर योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
सभापती जयसिंग माने यांनी खासदार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हायवे प्रोजेक्ट डायरेक्टर वसंत पंदरकर यांची भेट घेत नवीन रस्ता बांधून द्यावा, अशी विनंती केली. यामुळे काल हायवे डेप्युटी डायरेक्टर यांनी भेगा पडलेल्या रस्त्याची पाहणी करत पावसाळा संपल्यानंतर ताबडतोब रस्ता बांधून देणार असल्याचे कबूल केले. यामुळे वाडीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.