घोटगे, परमे गावे संपर्कहीन

घोटगे, परमे गावे संपर्कहीन

Published on

19127
दोडामार्ग ः गेले पाच दिवस पाण्याखाली असलेले परमे-घोटगे गावांना जोडणारे पूल. (छायाचित्र ः संदेश देसाई)

घोटगे, परमे गावे संपर्कहीन

ग्रामस्थांची परवड; अतिरिक्त पाणी सोडल्याने ‘तिलारी’ दुथडी

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २६ ः सतत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे तिलारी धरण व मेढे उन्नेई बंधाऱ्यातील अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडल्याने तिलारी नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीवर असलेले घोटगे-परमे पूल गेले पाच दिवस पाण्याखाली आहे. परिणामी दोन्ही गावांचा संपर्क तुटल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यात गेले आठवडाभर धुवाँधार पाऊस लागत असल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. कमी उंचीचे पूल पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुसळधार पावसाने तालुक्यात कहर माजविला असून सर्वत्र पाण्याचे लोट वाहू लागले आहेत. शेतीची कामेही स्थिरावली आहेत. काही गावांचा संपर्क तुटल्याने तेथील जनजिवन विस्कळीत झाले आहे. तिलारी धरण व तेरवण मेढे ऊन्नेई बंधाऱ्यातील प्रचंड प्रमाणात पाणी साठल्याने त्यातील अतिरिक्त पाणी तिलारी नदीत सोडले आहे. नदीपात्रात सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे नदीच्या प्रवाहात वाढ होऊन नदी दुथडी वाहत आहे. त्यामुळे नदीपात्रावरील कमी ऊंचीचे पुल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे. याच नदीवरील परमे-घोटगे हा पुल गेले पाच दिवस पाण्याखाली आहे. त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. पाच दिवस पुल पाण्याखाली असल्याने शिक्षणासाठी भेडशी, दोडामार्ग तसेच अन्य ठिकाणी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. ग्रामस्थांना देखील भाजीपाला व अन्य साहित्य बाजारपेठेतून आण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने त्यांचीही परवड झाली आहे.
------------
चौकट
नवीन पूल बांधूनही स्थिती ‘जैसै थे’
साटेली-भेडशी मार्गे परमे, घोटगे गावात जाण्यासाठी तिलारी नदी पार करावी लागायची. या गावात जाण्यासाठी नदीवर जे जुने पूल होते. ते कमी उंचीचे असल्याने पावसाळ्यात कायम पाण्याखाली असायचे. त्यामुळे पावसाळ्यात जीवघेणा प्रवास ग्रामस्थांना करावा लागत असे. या ठिकाणी सुसज्ज पूल होण्यासाठी ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार अलीकडेच त्याठिकाणी नवीन पूल उभारण्यात आले. मात्र, तेही पूल पावसाळ्यात पाण्याखाली जाते. दोन्ही बाजूंनी पुलाला उंची देण्यासाठी मुबलक जागा होती; मात्र, प्रशासनाने व पाटबंधारे विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने नवीन पूल बंधूनही ग्रामस्थांची परवड होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.