चिरेखाणीच्या सामानाची चोरी

चिरेखाणीच्या सामानाची चोरी

Published on

चिरेखाणीच्या सामानाची चोरी
रत्नागिरीः करबुडे येथील चिरेखाणीला लागणारे सुमारे ८२ हजाराचे सामान चोरीस गेले आहे. ग्रामीण पोलिसात याबाबत गुन्हा केला आहे. ही घटना ८ ते ९ जुलैच्या मुदतीत करबुडे येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा ११ हजार ७०० रुपयांच्या ३० लिटर मापाचे कॅन, चार कॅनमध्ये १२० लिटर डिझेल, १ हजार ८०० रुपयांचा चिरा उठवण्याचे दोन हंबीर, ३० हजाराचे कटर, २८ हजाराचे आडव्या मशिनचे कटर, ५०० रुपयांचा घण, ५०० रुपयांच्या ४२ खुंट्या, ८ हजार एक गिअर व पिनियन, दीड हजाराची हातोडी, सी चॅनल ३ नग असा सुमारे ८२ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने पळवला.
------
देवरूख येथे हातभट्टीवर कारवाई
रत्नागिरीः देवरूख-कोंडगाव चव्हाणवाडी (ता. संगमेश्वर) येथील झुडपाच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारू अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. देवरूख पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंगेश श्रीपत दळवी (वय ४१) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना कोडगांव चव्हाणवाडी येथील गणेशकट्ट्याच्या मागील झाडीझुडपात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित विनापरवाना हातभट्टीची गावठी दारू विक्रीसाठी बाळगलेल्या स्थितीत सापडला. त्याच्याकडे १ हजार २०० रुपयांची २० लिटर दारू, ३०० रुपयांची पाच लिटर दारू, २४० रुपयाचे पाच लिटर मापाचे प्लास्टिकचे त्यामध्ये ४ लिटर दारू असा १ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.