सात युवकांचा सरमळेत उद्या सन्मान

सात युवकांचा सरमळेत उद्या सन्मान

Published on

सात युवकांचा सरमळेत उद्या सन्मान
सावंतवाडी, ता. २६ ः सरमळे येथे तेरेखोल नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या वाहनांसह पर्यटकांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या सरमळे परिसरातील सात युवकांचा सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि अर्चना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. २८) सकाळी साडेदहाला सरमळे येथे सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी संजय सावंत, विश्वजीत गावडे, संजय गावडे, रजत देसाई, अक्षय तळवडेकर (सरमळे), एकनाथ दळवी (विलवडे), संजय गावकर (ओटवणे) यांना गौरविण्यात येणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य गजानन नाईक, अर्चना फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब, सरमळे सरपंच विजय गावडे आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराटकर आदींनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.