शिवापुरातील राऊळ कुटुंबाचे
आमदार नाईकांकडून सांत्वन

शिवापुरातील राऊळ कुटुंबाचे आमदार नाईकांकडून सांत्वन

20099
शिवापूर ः पुरात वाहून मृत्यू झालेल्या तुकाराम राऊळ यांच्या कुटुंबीयांची आमदार वैभव नाईक यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

शिवापुरातील राऊळ कुटुंबाचे
आमदार नाईकांकडून सांत्वन
कुडाळ ः पुरात वाहून मृत्यू झालेल्या शिवापूर येथील तुकाराम राऊळ व नुकतेच निधन झालेले मठ येथील रोहित बोवलेकर यांच्या घरी भेट देऊन आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. कुडाळमध्ये विद्युत पोलवर काम करीत असताना जखमी झालेले वायरमन महादेवाचे केरवडे येथील धनंजय फाले यांच्या घरी भेट देऊन विचारपूस केली. आमदार नाईक यांनी शुक्रवारी (ता. २८) राऊळ कुटुंबीयांची भेट घेऊन शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. यावेळी ठाकरे शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, शिरी नेवगी, उपसरपंच महेंद्र राऊळ, सुधीर राऊळ, ग्रामपंचायत सदस्य राजाराम पालकर, सुरेश नाईक, सुरेश बोभाटे, विठ्ठल बेळणेकर, दीपक राऊळ, शरद राऊळ, शैलेश राऊळ, आनंद राऊळ, मंगेश कदम, वेंगुर्ले तालुकाप्रमुख बाळू परब, शहर प्रमुख अजित राऊळ, संपर्क प्रमुख बाळा चिपकर, वायंगणी सरपंच सुमन कामत, उपतालुका प्रमुख उमेश नाईक, सुनील बोवलेकर आदी उपस्थित होते.
---
20098
तेंडोली ः येथील पुलावरील खड्डे ग्रामस्थांनी श्रमदानाने बुजविले.

तेंडोली पुलावरील खड्डे बुजविले
कुडाळ ः तेंडोली रवळनाथ मंदिर समोरील उज्ज्वला नदीवरील पूल पुराच्या पाण्याने वाहतुकीस धोकादायक झाले होते. पुलावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अपघाताची भीती होती. या पुलावरील खड्डे शुक्रवारी (ता. २८) ग्रामस्थांच्या सहकार्याने सिमेंट काँक्रिट घालून बुजविण्यात आले. या कामासाठी सरपंच अनघा तेंडोलकर, उपसरपंच संदेश प्रभू, माजी सरपंच भाऊ पोतकर, सोसायटी चेअरमन विजय प्रभू, ग्रामपंचायत सदस्य आकाश मुनणकर, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र राऊळ, प्रकाश राऊळ, आनंद नाईक, नाना परब, सुनील चव्हाण, सुनील मुनणकर, राकेश कुंभार यांनी आर्थिक सहकार्य केले. यावेळी सुनील तेंडोलकर, अरुण राऊळ, नवसू तेंडोलकर, संतोष तेंडोलकर, रवी तेंडोलकर, उत्तम तेंडोलकर, सिद्धेश तेंडोलकर, सदानंद राऊळ आदी ग्रामस्थांनी श्रमदान केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com