''सिंधुरत्न टॅलेंट सर्च'' उपक्रम स्तुत्य

''सिंधुरत्न टॅलेंट सर्च'' उपक्रम स्तुत्य

swt315.jpg
M20101
कुडाळः सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला लॅपटॉप प्रदान करताना आमदार नीतेश राणे. सोबत अॅड. संग्राम देसाई, संदेश सावंत, संजना सावंत, दादा साईल, विनायक राणे आदी. (छायाचित्रः अजय सावंत)

‘सिंधुरत्न टॅलेंट सर्च’ उपक्रम स्तुत्य
नीतेश राणेः कुडाळात यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३१ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी नेहमीच प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्यासारखे कार्यकर्ते पुढे येत आहेत. सिंधुरत्न टॅलेंट सर्च या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम राबवत कौतुकास्पद असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी सांगितले.
येथील मराठा समाज हॉल येथे युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार राणे यांच्या हस्ते झाला. यावेळी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे उपाध्यक्ष संग्राम देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना सावंत, भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल, दीपलक्ष्मी पडते, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, भाजप गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, राजेश पडते, राकेश कांदे, विजय भोगटे, संजय सावंत, महेंद्र सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक इयत्तेतील पहिल्या ५० अशा २५० गुणवंत विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहावी व सातवी प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना लॅपटॉप व दुसरी, तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. शिक्षकांमध्ये प्राथमिक विभागातून अमोल गोसावी, माध्यमिक विभागातून सद्गुरू साटेलकर यांना युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आमदार राणे म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे युवा संदेश प्रतिष्ठानमार्फत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेतली जात आहे. या स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस मदत होते. संदेश सावंत यांचे हे कार्य अभिमानास्पद आहे. केंद्रीय मंत्री राणेंकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अशा उपक्रमांतून यशस्वी साथ मिळत आहे. विद्यार्थ्यांना गुणवंत करण्याचा घेतलेला ध्यास कौतुकास्पद आहे."
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सावंत यांनी यावेळी पुढील वर्षापासून सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा इंग्लिश माध्यमातही सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com