मणिपूर हिंसाचाराचा सावंतवाडीत निषेध

मणिपूर हिंसाचाराचा सावंतवाडीत निषेध

मणिपूर हिंसाचाराचा
सावंतवाडीत निषेध
सावंतवाडी ः मणिपूर येथील हिंसाचाराचा सावंतवाडी येथे आंबेडकरी समाजातर्फे निषेध करण्यात आला. याबाबत लवकरच सर्वांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घ्यावा, असे ठरविण्यात आले. याबाबत राष्ट्रपतींना निवेदन देण्याचा ठरावही झाला. मणिपूर घटनेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी कार्यकर्त्यांची निषेध बैठक येथील डॉ. आंबेडकर समाज मंदिर सभागृहात झाली. प्रारंभी मोहन जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. डॉ. देविदास बोर्डे, अ‍ॅड. एस. व्ही. कांबळे, परेश जाधव, बार्टी समतादूत सगुण जाधव, सामाजिक कार्यकर्ते वासुदेव जाधव, महिला कार्यकर्त्या सत्वशीला बोर्डे आदींनी चर्चेत भाग घेऊन तातडीने निवेदन तयार करून राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवावे, असे सूचित केले.
---
‘लांब पल्ल्यासाठी
सुयोग्य बस हवी’
दोडामार्ग ः पणजी-दोडामार्ग-देवगड ही एसटी बस दोडामार्ग स्थानकात आली असता या बसचे ब्रेक लायनर लागून राहिल्याने व तशीच चालवल्यामुळे टायरने पेट घेतला. अचानक आलेल्या धुरामुळे प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. प्रसंगावधान राखत प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. यासाठी गोपाळ गवस आदींनी मदतकार्य केले. बऱ्याच गाड्या प्रवासादरम्यान बंद पडतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. अशा नादुरुस्त गाड्यांमुळे केव्हाही अपघात घडू शकतात. त्यामुळे लांब पल्याच्या फेऱ्यांसाठी सुस्थितीतील एसटी बसेस पाठवा, अशी मागणी शिवसेना कार्यकर्ते गोपाळ गवस यांनी केली आहे.
------------------
रस्त्यासाठी घोंगळेंचा
उपोषणाचा इशारा
दोडामार्ग ः पिकुळे मुख्य रस्ता ते बावाचे टेंबवाडीपर्यंत जाणारा रस्ता बंद आहे. तो खुला न झाल्यास १५ ऑगस्टला पंचायत समितीसमोर उपोषणास बसण्याचा इशारा भरत घोगळे यांनी पिकुळे सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदनाद्वारे दिला आहे. पिकुळे मुख्य रस्ता ते बावाचे टेंबवाडीपर्यंत रस्त्याची नोंद ग्रामपंचायत २३ नंबरला आहे; मात्र तो बंद असून, याबाबत ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे वारंवार अर्ज केले. दोन्ही कार्यालयांनी यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याने रस्ता अद्यापही बंदच आहे. हा रस्ता १५ ऑगस्टपूर्वी खुला न केल्यास पत्नी व मुलांसहित उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
------------------
मालवण येथे
आज ग्रंथप्रदर्शन
मालवण ः येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित साने गुरुजी वाचन मंदिरतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवीन खरेदी केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन साने गुरुजी वाचन मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकार अमित खोत यांच्या हस्ते होईल. ग्रंथप्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन अध्यक्ष रुजारिओ पिंटो यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com