वंदे भारत रेल्वेला चिपळूण थांबा द्या

वंदे भारत रेल्वेला चिपळूण थांबा द्या

१२ (टूडे ३ साठी, संक्षिप्त)

‘वंदे भारत’रेल्वेला चिपळुणात थांबा मिळावा

सावर्डे ः कोकण रेल्वेमार्गावर मुंबई ते मडगावदरम्यान हायस्पीड वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे; पण या रेल्वेला रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी व खेड अशा दोनच ठिकाणी थांबा आहे. चिपळूण हे रत्नागिरी जिल्ह्याचे मध्यवर्ती व महत्वाचे ठिकाण असल्याने चिपळूण येथे वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा यासाठी आमदार शेखर निकम यांनी सोमवारी सकाळी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. वंदे भारत ट्रेनला थांबा मिळावा यासह अन्य विषयांवर या वेळी आमदार निकम यांनी रावसाहेब दानवे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या वेळी अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे बाबाजीराव जाधव, जिल्हा बँक संचालक राजू सुर्वे, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव आदी उपस्थित होते. आमदार निकम यांच्या निवेदनावर रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
----------------

गणपतीपुळेतील व्यापाऱ्यांना पालकमंत्र्यांकडून मदत

गणपतीपुळे ः समुद्राच्या मोठ्या लाटामुळे येथील स्थानिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांची पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहणी करून व्यापारांना योग्य ती मदत केली जाईल, असा शब्द दिला होता. त्याप्रमाणे ३६ व्यावसायिकांना श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून ५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. या वेळी आण्णा सामंत, राजन शेट्ये, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, स्मितल पावसकर, रोशन फाळके, प्रकाश साळवी आदी उपस्थित होते.
----------
-rat३१p१३.jpg ः
२३M२०१०९
सावर्डे ः न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज आंबडस विद्यालयात पुणे येथील नामवंत शिक्षणतज्ञ डॉ. दिलीप देशमुख यांचे स्वागत करताना मुख्याध्यापक चोरगे व्ही. डी., डावीकडून चेअरमन अशोक निर्मळ, एक्सेल समन्वमक शेंड्ये सर.
--------------
आंबडस न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कार्यशाळा

सावर्डे ः आंबडस न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाविषयी स्वामी विवेकानंद रिसर्च इन्स्टिट्यूट व एक्सेल कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील नामवंत शिक्षणतज्ञ डॉ. दिलीप देशमुख यांची शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळा झाली. डॉ. देशमुख यांनी नवीन शैक्षणिक धोरण व धोरणात्मक बदल कसे असतील, शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करून अधिकाधिक चांगले अध्यापन करावे व नवनवीन तंत्रज्ञानांचा अध्यापनात वापर कसा करावा, याबाबत सांगितले. कार्यक्रमाला एक्सेल कंपनीचे समन्वयक शेंड्ये, विद्यालयाचे मुख्याध्यापक चोरगे व विद्यालयाचे चेअरमन अशोक निर्मळ यांनी शुभेच्छा दिल्या.
----------------

जिल्ह्यात पीएम किसान हप्त्यांचे वितरण

रत्नागिरी ः दक्षिण रत्नागिरी भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात एकूण ६४ किसान समृद्धी केंद्रांमध्ये पीएम किसान योजनेच्या १४व्या हप्त्याचे वितरण आरंभाचे सिकर, राजस्थान येथून प्रसारण करण्यात आले. जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापुर, संगमेश्वर, देवरूख येथील केंद्रामध्ये एकूण ९१२ शेतकरी उपस्थित होते. देशातील किसान समृद्धी केंद्रांची संख्या २.८ लाख एवढी होणार असून, या ठिकाणी शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, औषधे, खते, कीटकनाशके हे एकाच ठिकाणी रास्त दरात उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना माती, बियाणे आणि खतांच्या चाचणीची सुविधा उपलब्ध करून देणे किंवा जेथे चाचणी सुविधा उपलब्ध आहे त्या केंद्रांशी शेतकऱ्यांना जोडून देणे, शेतकऱ्यांना लागणाऱ्या अन्य सेवा विक्री पद्धतीने किंवा कस्टम हायरिंग सेंटरद्वारे उपलब्ध करून देणे, शेतकऱ्याना विविध गोष्टींबाबत माहिती पुरवणे, केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी कल्याणाच्या योजनांची माहिती देणे, खते, औषधे, कीटकनाशके यांचा मागणीनुसार पुरवठा होईल, टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी घेणे या सुविधा शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी हा प्रसारण कार्यक्रम व माहितीसाठी योग्यप्रकारे नियोजन केले याबद्दल शेतकऱ्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे आभार मानले.
-----

उद्वव ठाकरे वाढदिवसानिमित्त देवरुखात ब्लॅंकेट वाटप

देवरूख ः देवरूख शहर (उबाठा गट) शिवसेनेच्यावतीने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमेश्वर चिपळूण मतदार संघाचे संपर्कप्रमुख सुरेश कदम यांच्या पुढाकाराने देवरूखात ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रोहन बने, जिल्हाप्रमुख विलास चाळके, महिला संपर्कप्रमुख नेहा माने, संपर्कप्रमुख सुरेश कदम, तालुका संपर्कप्रमुख राजेश शेलार, महिला जिल्हा संघटक वेदा फडके, माजी सभापती बंड्याशेठ बोरूकर, शहरप्रमुख दादा शिंदे, माजी उपसभापती छोट्या गवाणकर, युवा सेना तालुकाप्रमुख मुन्ना थरवळ, युवा सेना उपशहरप्रमुख तेजस भाटकर, उपशहरप्रमुख शहिद बोदले व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com