नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा मोर्चा तूर्तास स्थगित

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा मोर्चा तूर्तास स्थगित

swt3111.jpg
20130
सावंतवाडीः मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना देविदास आडारकर व इतर कर्मचारी.

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा मोर्चा तूर्तास स्थगित
सावंतवाडी, ता. ३१ : नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज राजव्यापी मोर्चा काढण्यात येणार होता; मात्र विधानसभेचे कामकाज बंद असल्यामुळे हा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती सावंतवाडी नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देविदास आडारकर यांनी दिली. याबाबत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत आज राजव्यापी मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते; मात्र विधानसभेचे कामकाज बंद असल्याने महामोर्चा तूर्तास स्थगित करण्यात आला असून राज्य पातळीवर संघटनेच्या झालेल्या निर्णयानुसार शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज नगरपरिषदेसमोर निदर्शने करण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पोहोचवाव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.
............
swt3113.jpg
M20132
सांगेलीः घोलेवाडी पुलाची लोकसहभागातून डागडुजी करण्यात आली.

सांगेली-घोलेवाडी पुलाची
लोकसहभागातून डागडुजी
सावंतवाडी, ता. ३१ः अतिवृष्टीमुळे धोकादायक झालेल्या सांगेली-घोलेवाडी येथील पुलाची आज लोकसहभागातून व श्रमदानातून डागडुजी करण्यात आली. यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, तालुका सरचिटणीस रुपेश आईर यांनी आवश्यक असलेले सिमेंट, रेती आदी साहित्य उपलब्ध करून दिले. सांगेली सरपंच लवू भिंगारे, उपसरपंच संतोष नार्वेकर, बापू आईर, लक्ष्मण राऊळ, सूरज सावंत, मोतिराम सावंत, संतोष तावडे, विलास इळेकर, अशोक देसाई, मिथुन रेडीज, गुरू रेडीज, प्रकाश रेडीज, सचिन राणे, श्यामसुंदर राऊळ आदींनी यासाठी सहकार्य केले. ग्रामस्थांनी या दात्यांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com