स्पर्धेच्या युगात सक्षम विद्यार्थी घडवूया

स्पर्धेच्या युगात सक्षम विद्यार्थी घडवूया

१५ (टुडे पान ३ साठी)


-rat३१p११.jpg ः
२३M२०१०७
सावर्डे ः पालकसभेत मार्गदर्शन करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे.
-----------

सक्षम विद्यार्थी घडवूया ः वारे

सावर्डे, ता. ३१ ः स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्वक वावरणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्या पायाभूत संकल्पना दृढ होणे गरजेचे आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी सक्षम करणे ही काळाची गरज आहे. ज्ञानार्जनाबरोबरच कौटुंबिक जाणीव असणारा विद्यार्थीच भविष्यात यशस्वी होईल. पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या संवादातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास साधून स्पर्धेच्या युगात सक्षम विद्यार्थी घडवूया, असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी केले. फाउंडेशन कोर्सने विद्यार्थ्यांची तयारी होणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिस्त महत्वाची आहे. सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा झाली. सभेला १२१३ पालक उपस्थित होते. या प्रसंगी अथर्व नांदिवडेकर, प्राची शिवडे व उमेर चिकटे या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह दीप्ती बुदर, साक्षी निर्मळ, संघर्ष ढेरे, धनश्री पंडित, भक्ती कोळी, यश मोरे, प्रणव गायकवाड व साई तांबे यांचा सत्कार करण्यात आला व नीट परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केलेल्या शिवानी साळुंखे व सानिया दडस या माजी विद्यार्थिनींना गौरवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com