मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण

मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण

२३ (टुडे ३ साठी)

-rat३१p१९.jpg-
२३M२०१२७
रत्नागिरी ः बॅंक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेत मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी.
------------

विद्यार्थ्यांना मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण

स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेचे आयोजन ; २५ जणांचा सहभाग

रत्नागिरी, ता. ३१ ः बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेत एक महिना कालावधीचे मोबाईल दुरुस्ती आणि सेवा प्रशिक्षण झाले. प्रशिक्षणात जिल्ह्यातील २५ प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला. प्रशिक्षणात देण्यात आलेल्या माहितीचा उपयोग प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करताना होईल. प्रशिक्षणामधून आम्हाला व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया उमेदवारांनी व्यक्त केल्या.
या प्रशिक्षणात सेलफोन इन जीएसएम टेक्नॉलॉजी, डिजिटल मल्टिमीटर इन्फॉर्मेशन, कंपाऊंट चेकिंग, हॉट एअर गन युज आणि डी सोल्डरिंग, ट्रॅक चेकिंग आणि रीट्रेकिंग, ऑल टाईप सॉकेट चेंज, आयसी आयडेंटिफिकेशन आणि वर्क, ऑडिओ सेक्शन चेकिंग, फॉल्ट फाइंडिंग आणि जम्पिंग, सेल फोन ऑल सेक्शन व्होल्टेज, मदरबोर्ड सर्व्हिसिंग, माईक स्पीकर चेकिंग आणि सोल्डिंग, चार्जिंग सॉकेट चेंग आणि सोल्डिंग डिस्प्ले सोल्डरिंग आणि जम्पिंग, मोबाईल दुरुस्तीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची ओळख आदी प्रकार प्रात्यक्षिकासह शिकवण्यात आले.
या वेळी व्यक्तिमत्व विकास, उद्योजकीय सक्षमता, विकास, विविध खेळाच्या माध्यमातून व्यवसायाची आणि बँकेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. मोबाईल दुरुस्ती आणि सेवा प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून समीर कदम यांनी काम पाहिले. संस्थेचे संचालक दर्शन कानसे यांचे प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी संस्थेचे प्रशिक्षक, देवेंद्र सांबरे, प्रसाद कांबळे, विदिशा गावखडकर, ऐश्वर्या पिलणकर व प्रसाद शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com