रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

रत्नागिरी परिसरात
गणेशोत्सवाचे वेध
रत्नागिरी ः तालुक्यातील मालगुंड-नेवरे-धामणसे-सैतवडे आदी परिसरात गणेशोत्सवाची चाहूल लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गणेश चित्रशाळेमध्ये गणपती सांगण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. गणेशोत्सव काही दिवसावरच आला असून अनेक गणपती चित्रशाळेत आपापल्या घरगुती गणपतीचे चित्र कसे पाहिजे हे सांगण्यासाठी येथील स्थानिक ग्रामस्थांनी दररोज गर्दी करताना दिसत आहेत. आपापला गणपतीचा पाठ देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येत आहे. याबाबत गणेश चित्रशाळेचे मालक विजय निवेदकर धामणसे यांच्याजवळ संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, सध्या त्यांच्या चित्रशाळेत दोनशेहून अधिक वेगवेगळ्या आकाराचे गणपती असून, अगदी 1200 पासून सुमारे दहा हजारापर्यंत गणपती उपलब्ध आहेत. सध्या गणपतीची माती महाग झाल्याने यावर्षी गणपतीच्या किंमतीत थोड्या फार प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या गणपती काढण्याचे काम चालू असून, काही दिवसानंतर रंगवण्याचे काम चालू होईल.

जिल्हा-नगर वाचनालयात पुस्तक प्रदर्शन
रत्नागिरी ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगतेनिमित्त रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात भव्य पुस्तक प्रदर्शन, पुस्तक विक्री, व्याख्यान, निबंध स्पर्धेचे आयोजन केल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. स्वातंत्र्यलढ्यातील थोर व्यक्तिमत्वाच्या संदर्भात रोचक व्याख्यान आणि स्पर्धा आयोजित केल्या आहेत. 1 ते 12 ऑगस्टपर्यंत पुस्तक प्रदर्शन आणि पुस्तक विक्री होईल. यात या पुस्तकांवर मोठी सवलत विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी निमित्ताने व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफले जाणार आहे. 12 ऑगस्टपर्यंत अनेक गुरूजन विद्यार्थ्यांसाठी थोर वीरपुरुषांच्या चरित्रासंदर्भाने व्याख्यान देतील. पुस्तक प्रदर्शन पाहून त्यावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शहर परिसरातील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.


‘डीबीजे’मध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग
रत्नागिरी ः चिपळूण येथील डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाच्यावतीने महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला चिपळूणच्या पोलिस उपनिरीक्षक पूजा चव्हाण उपस्थित होत्या. दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चव्हाण यांनी मुलींना सोशल मीडिया वापरताना सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन केले. महिला व बालविकास अधिकारी माधवी जाधव यांनी मार्गदर्शन केले, तर योगिता खाडे यांनी मुलींनी जिद्द आणि आत्मविश्वास ठेवल्यास कोणतेही ध्येय सहज गाठता येते, असे मार्गदर्शन केले व स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले. या वेळी प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य प्रा. नामदेव तळप, पर्यवेक्षिका स्नेहल कुलकर्णी तसेच रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com