रत्नागिरी- ढिसाळ कारभाराविरोधात मनसे आक्रमक

रत्नागिरी- ढिसाळ कारभाराविरोधात मनसे आक्रमक

फोटो ओळी
-rat३१p२४.jpg- KOP२३M२०१४९ रत्नागिरी : एसटीच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात मनसेतर्फे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांना निवेदन देताना रूपेश जाधव. सोबत राजू पाचकुडे, रूपेश चव्हाण, अशोक नाचणकर, अंजली सावंत आदी.


एसटीच्या कारभाराविरोधात मनसे आक्रमक

प्रशासनाला विचारला जाब; १५ दिवसांत स्थीती सुधारण्याची मागणी
रत्नागिरी, ता. ३१ ः एसटी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसेने एस. टी. प्रशासनाला आज जाब विचारला. गाड्यांचा अनियमितपणा, गळक्या व नादुरुस्त गाड्यांतून प्रवासी वाहतूक केली जात आहे, याविरोधात प्रवासी, नागरिकांच्या तक्रारी मनसेकडे पोहोचल्या. त्यानंतर आज मनसेने थेट विभाग नियंत्रकांची भेट घेऊन गलथान कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
एसटीच्या गळक्या व नादुरुस्त गाड्यांतून प्रवासी वाहतूक, आगार व्यवस्थापकांचे प्रवाशांसोबतचे उद्दाम वर्तन, एस. टी. बसेसच्या अनियमित वेळा, पूर्वसूचना न देता एसटी फेरी रद्द करणे याविरुद्ध मनसेने प्रशासनाला जाब विचारला. येत्या १५ दिवसांत सुधारणा करण्यात याव्यात, अन्यथा मनसेच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.
या वेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांना निवेदन देण्यात आले. मनसेचे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव, तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, रूपेश चव्हाण, विशाल चव्हाण, अभिलाष पिलणकर, रस्ते आस्थापना उपजिल्हासंघटक अशोक नाचणकर, महिला शहराध्यक्ष सौ. अंजली सावंत, शहर सचिव सौ. सारिका शर्मा, सौ. सर्वेशा चव्हाण, अखिल शाहू, सोम पिलणकर, राहुल खेडेकर, रूपेश पाचकुडे, नवनाथ साळवी, संदीप सुर्वे, संतोष चव्हाण, अभि कट्टीमणी, आदेश धुमक, यश पोमेंडकर, आकाश फुटक आदी पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


चौकट १
विद्यार्थ्यांची गैरसोय
अपुऱ्या गाड्या, गळक्या आणि नादुरुस्त एसटी गाड्यांमुळे गेले महिनाभर शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. गाड्या कधीही बंद पडतात, त्या त्या मार्गावर गाड्या सुटतही नाहीत, अशा वेळी विद्यार्थ्यांनी काय करावे, असा सवाल मनसेने विचारला. या कारभारात १५ दिवसांत सुधारणा झाली नाही. तर आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com