खारेपाटण विभागातच पदे रिक्‍त का?

खारेपाटण विभागातच पदे रिक्‍त का?

20175
कणकवली : खारेपाटण विभागातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केले.


खारेपाटण विभागातच पदे रिक्‍त का?

ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना घेराओ; बदली शिक्षक देण्याच्या ग्‍वाहीनंतर आंदोलन मागे

कणकवली, ता.३१ : तालुक्‍यात केवळ खारेपाटण विभागातच अधिक संख्येने शून्य शिक्षकी शाळा आहेत. तर बदली प्रक्रियेनंतर अनेक शाळांमध्ये नवीन शिक्षक आलेले नाहीत. एकट्या खारेपाटण विभागातच शिक्षकांची पदे रिक्‍त का? असा प्रश्न करून खारेपाटण दशक्रोशीतील ग्रामस्थांनी आज गटविकास आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना घेराओ घातला. दरम्‍यान, ज्‍या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्‍त आहेत. त्‍या शाळांवर तातडीने इतर शाळांतील शिक्षक कामगिरीवर पाठवले जातील. याबाबतची प्रक्रिया आजच पूर्ण करू, अशी ग्‍वाही गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्‍यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
खारेपाटण विभागामधील हसोळ टेंब, वायंगणी, रामेश्वरनगर, वारगाव, नडगिवे या शाळांमध्ये शिक्षक नियुक्‍त झालेले नाहीत. त्‍यामुळे आक्रमक झालेले सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्‍हा परिषदेचे माजी सदस्य बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये, माजी पंचायत समिती सदस्य तृप्ती माळवदे, चिंचवली सरपंच अशोक पाटील, माजी सरपंच अमित मांजरेकर, वायंगणी उपसरपंच प्रताप फाटक, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य दक्षता सुतार, क्षितिजा धुमाळे, मनाली होणाळे आदींनी आज गटविकास अधिकारी यांच्या दालनात आंदोलन केले. तसेच तेथे आलेले गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांना घेराओ घातला. जोपर्यंत रिक्‍त जागांवर शिक्षकांची नियुक्‍ती होत नाही, तोवर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार उपस्थितांनी केला.
---
गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा
ग्रामस्थांच्या आक्रमकतेनंतर गट शिक्षणाधिकारी श्री.गवस यांनी गटविकास अधिकारी श्री.चव्हाण यांच्याशी चर्चा केली. या नंतर शिक्षकांची रिक्‍त पदे असलेल्‍या शाळांवर अन्य शाळांतील शिक्षकांना कामगिरी देण्यात आली. त्या बाबतच्या आदेशाची प्रत देखील उपस्थितांना दाखविण्यात आली. त्‍यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com