जय गणेश स्कूलमध्ये पालक दिन

जय गणेश स्कूलमध्ये पालक दिन

20181
मालवण ः जयगणेश इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पालकदिन साजरा करण्यात आला.

जय गणेश स्कूलमध्ये पालक दिन
मालवण : येथील मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज पालक दिन उत्साहात साजरा झाला. मुलांना संस्कृतीची जाणीव व्हावी, पालक व पाल्यांमधील प्रेम वाढीस लागावे, यासाठी प्रशालेतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुलांनी आपल्या पालकांचे चरणक्षालन करून ओवळणी केली व आशीर्वाद घेतले. या उपक्रमाबद्दल सर्व पालकांनी गौरवोद्गार काढले. यावेळी सर्व वर्ग शिक्षकांनी ‘आई बाबांचे मुलास पत्र’ याचे वाचन केले. प्रशालेतील शिक्षिका करमळकर व घाटवळ यांनी इतर शिक्षकांच्या मदतीने कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केले. निशिकांत पराडकर व राणे यांनी निवेदन केले. पालकांमधून शामसुंदर वाक्कर व प्रसाद वालावलकर यांनी मनोगत व्यक्त केले.
................
मोरेश्वर मंदिराच्या हायमास्ट टॉवरसाठी निधी
मालवण : शहरातील दांडी येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या मोरेश्वर देवालयाकडील हायमास्ट टॉवरच्या कामाला भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पाठपूराव्यातून चालना मिळाली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम २०२१-२२ च्या निधीतून या कामाला ५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे येत्या काळात मोरेश्वर देवालयाचा परिसर झळाळणार आहे. याबद्दल नागरिकांनी मंत्री राणे, माजी खासदार राणे व पाटकर यांचे आभार मानले. देऊळवाडा येथील दाभोळकर घर ते मोर्ये घराकडील गटाराच्या कामालाही मंत्री राणे यांच्या खासदार निधीतून व पाटकर यांच्या प्रयत्नातून ५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. या दोन्ही कामांसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजप नेते देवदत्त सामंत यांचेही सहकार्य लाभल्याची माहिती पाटकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com