कशेडी घाटात बर्निग टँकरचा थरार

कशेडी घाटात बर्निग टँकरचा थरार

टूडे २ साठी)


कशेडी घाटात बर्निग टँकरचा थरार
खेड ः मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटामध्ये मुंबईहून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या रिकाम्या एलपीजी गॅसच्या टँकरला अपघात होऊन टँकरला भीषण आग लागली. शनिवारी (ता. २९) रात्री ९.३० च्या सुमारास झालेल्या अपघातामुळे महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघात झाल्यानंतर महाड एमआयडीसी तसेच खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण केले. खेड पालिकेच्या आणि महाड एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आठ वाजल्यापासून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. अपघातामुळे कशेडी घाटात दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल २ तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश आले; मात्र या घटनेने घाटामधील वाहतूक ठप्प झाली होती.

कशेडी घाटातून जीव मुठीत घेऊन प्रवास
खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना पावसाळ्यात नेहमीच कशेडी घाटातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. येथील वळणावळणाचा घाट आणि महामार्गावर दरडमाती येणे या घटना पावसाळ्यात घडत असतात. त्यामुळे अपघातही होतात. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून कशेडी घाटातून गेली दोन वर्षे बोगद्याचे काम सुरू होते. त्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामाची पाहणीदेखील केली होती. कशेडी बोगद्याची एक मार्गिका या महिनाअखेर खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कशेडी घाटात नेहमीच अपघात होत असतात. मुंबई-गोवा महामार्गाने सिंधुदुर्गात जातान कशेडी घाट हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सिंधुदुर्गात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी हा इंटरव्हल आहे. कारण, पनवेलपासून १५० किमीचा टप्पा या घाटात पूर्ण होतो. हा घाट उतरलो की, रत्नागिरी जिल्हा सुरू होतो. नागमोडी वळणांचा डोंगराळ भाग आणि त्यातून चौपदरी महामार्ग उभारताना बरीच आव्हाने होती. ती पार करत या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाल्यात जमा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com