करिअरसाठी वेगळे पर्याय निवडा

करिअरसाठी वेगळे पर्याय निवडा

20198
कणकवली : येथील क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाजाच्या मेळाव्यात विजय घाडीगावकर यांनी मार्गदर्शन केले.


करिअरसाठी वेगळे पर्याय निवडा

विजय गावकर : घाडीगावकर समाजातील गुणवंतांचा कणकवलीत गौरव

कणकवली, ता.३१ : विज्ञान तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांमुळे असलेल्‍या नोकऱ्या धोक्‍यात येऊ लागल्‍या आहेत. त्‍यामुळे कौशल्‍यावर आधारीत करिअरचे वेगळे पर्याय निवडा, असे आवाहन क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाजाचे नेते विजय गावकर यांनी केले.
कणकवलीत क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज संस्थेचा जिल्‍हा मेळावा झाला. यात दहावी, बारावी, पदवी, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती तसेच विविध क्षेत्रात उज्‍वल यश मिळविलेल्‍या गुणवंतांचा सत्‍कार झाला. यात विजय घाडीगावकर यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
या मेळ्यावाला क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाचे मुंबई मध्यवर्ती उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगांवकर, सिंधुदुर्ग अध्यक्ष सूर्यकांत घाडी, प्रदीप घाडी, बुधाजी घाडीगांवकर, सुनिल गांवकर, विलास गांवकर, कैलास घाडीगांवकर, अशोक घाडी, सत्यवान घाडीगांवकर, दत्तगुरु गांवकर, कळसुलकर गुरुजी, सदानंद घाडीगांवकर, भांडुप उपाध्यक्ष सुरेश गांवकर, आडेलकर गुरुजी, उत्तम गांवकर, कृष्णा घाडीगांवकर, सुभाष गांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात घाडीगावकर समाजातील ज्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेत ७५ टक्‍के पेक्षा अधिक, बारावी परीक्षेत ६० टक्‍के पेक्षा अधिक गुण मिळविलेल्‍या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत, नवोदय निवड यादीतील विद्यार्थी, इंजिनिअरिंग, मेडिकल, बी. फार्मसी तसेच इतर क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com