चिपळूण ः पाऊस पडला चिखल झाला, पायरी नाही मंदिराला

चिपळूण ः पाऊस पडला चिखल झाला, पायरी नाही मंदिराला

फोटो - ratchl314.jpg ःKOP23M20218 चिपळूण ः सावर्डेतील महापुरुष मंदिरासमोर झालेली आरती.

पाऊस पडला चिखल झाला, पायरी नाही मंदिराला

अभंग तालावर सावर्डेवासीयांचे राष्ट्रीय महामर्ग विभागाला साकडे
चिपळूण, ता. ३१ ः पाऊस पडला चिखल झाला, पायरी नाही मंदिराला, अशा अभंगाच्या तालावर सावर्डे येथील ग्रामस्थांनी महापुरुषाच्या मंदिराला पायऱ्या व्हाव्यात, यासाठी महाआरतीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग विभागाला साद घातली. शिवसेना तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनाला परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावर्डे पोलिस वसाहत परिसरातील महापुरुष मंदिराच्या पायऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत तोडल्या आहेत. वर्षभर ही परिस्थिती कायम असून, या कालावधीत मंदिरात आरतीदेखील झालेली नाही. पायरी नसल्याने भाविकांना मंदिरात जाता येत नाही. त्यात आता राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंदिरासमोरच संरक्षक भिंत उभारल्याने नव्याने पायऱ्या उभारणे अशक्य बनले आहे. सावर्डे पोलिस वहाळफाटा येथे स्थलांतरित झाल्याने या मंदिरातील पूजाअर्चाही थांबली आहे. आजूबाजूचे ग्रामस्थ या मंदिरात दर्शनासाठी नियमित जात असत; परंतु पायऱ्या नसल्याने त्यांच्यापुढेही पेच निर्माण झाला आहे.
श्रावणी सोमवारनिमित्त या मंदिरात सावर्डे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी पायऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात यावा, अशी मागणी अनेकदा केली होती; परंतु राष्टीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत. या पार्श्वभूमीवर, संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाआरती करत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष वेधण्यात आले. रवी सुर्वे, लक्ष्मण कोकमकर, दिनेश वहाळकर, दिनेश घोरपडे, वसंत गोमाणे, विजय नेवरेकर, अनंत निर्मळ, नयन कुळे, संभाजी पालशेतकर, विजय तांदळे, जयराम म्हालीम, तुकाराम मेस्त्री, राजेश शिरकर, सुजित शिरकर, शांताराम राणीम, मनोज खांडेकर, सागर सावंत, प्रशांत सावंत, धीरज सावंत आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com