8 हजार 412 शेतकर्‍यांनी उतरवला एक रुपयात विमा

8 हजार 412 शेतकर्‍यांनी उतरवला एक रुपयात विमा

३० (पान २ साठी मेन)

शेतकऱ्‍यांनी उतरवला एक रुपयात विमा

जिल्ह्यात ८ हजार ४१२ जणांचा समावेश ; गुरूवार पर्यंत मुदतवाढीचा निर्णय

रत्नागिरी, ता. ३१ ः हवामानातील बदलांचा परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाच्या पंतप्रधान पिकविमा योजनेत रत्नागिरी जिल्ह्यातील भातपिकाचा ८,१०६ तर नाचणीचा ३०६ असा मिळून ८, ४१२ शेतकऱ्‍यांनी एक रुपयात विमा उतरवला आहे. ३ ऑगस्टपर्यंत मुदत मिळाल्यामुळे त्यात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गतवर्षी ३ हजार २०० शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला होता.
पूर्वी पिकविम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्‍यांना भरावी लागत होती; मात्र, यंदा एक रुपयात पिकविमा योजना शासनाने जाहीर केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भात आणि नाचणी या दोन पिकांचा समावेश करण्यात आला आहे. भातासाठी हेक्टरी ५० हजार तर नागलीसाठी २० हजार विमा संरक्षित रक्कम निश्चित केली आहे. सध्या भातलावणीची कामे सुरू असल्यामुळे विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्‍यांना वेळ मिळालेला नव्हता. गेले काही दिवस मुसळधार पावसामुळे जनजीवनही विस्कळीत होते. परिणामी, शासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. ३१ जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात दोन्ही पिकांचे मिळून ८ हजार ४१२ शेतकऱ्‍यांनी विमा उतरवला आहे. त्यामुळे २२०२.१४ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. जिल्ह्यातून १० कोटी ८१ लाख रुपयांची रक्कम संरक्षित झाली आहे.
---
अडीचपट वाढ

जिल्ह्यात भातशेतीचे उत्पादन चांगले असल्यामुळे पिकविमा निकषातील तरतुदींमुळे नुकसान भरपाई शेतकऱ्‍यांना मिळत नाही. त्यामुळे विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी उत्सुक नसतात. दोन वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्तीत शेतकऱ्‍यांचे नुकसान झाले होते. त्या वेळी विमा उतरवलेल्या शेतकऱ्‍यांना लाभ मिळाला होता. त्यानंतर विमा उतरवणऱ्‍या शेतकऱ्‍यांत वाढ झाली.
----
चौकट

*तालुका*भात*नाचणी*क्षेत्र (हेक्टर)
* राजापूर*५१३*२१*१६८.४७
* लांजा*४२८*३४*१३५.८६
* रत्नागिरी*५५२*२८*१२०.१९
* संगमेश्‍वर*१३६४*२३*३८९.३३
* चिपळूण*१०४९*२७*३५९.५३
* गुहागर*२९३*३७*१००.३७
* खेड*१७३१*३८*४७८.३४
* दापोली*१०३६*५०*२३८.१४
* मंडगणड*११४०*४८*२११.९१

----
कोट

प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्‍यांना एक रुपया भरून पिकविमा पोर्टलवर नोंदणी करता येत आहे. शेतकरी हिश्श्याची पिकनिहाय प्रतिहेक्टरी विमा हप्ता रक्कम व शेतकऱ्‍यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता एक रुपया वजा जाता उर्वरित फरकाची रक्कम राज्यशासन भरणार आहे. मुदत वाढवण्यात आली असून, त्याचा लाभ शेतकऱ्‍यांनी घ्यावा.

- सुनंदा कुर्‍हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com