रत्नागिरी-फोटो, व्हिडिओ

रत्नागिरी-फोटो, व्हिडिओ

फोटो ओळी
-rat३१p३५.jpg-KOP२३M२०२१४ रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा फोटो, व्हिडिओ व्यावसायिकांच्या सहकारी संस्थेतर्फे आयोजित कार्यशाळेत सहभागी छायाचित्रकार.
---------

कलात्मक पद्धतीने फोटोतील भावना पोहोचवा
रंजन झिंगाडे ; फोटो, व्हिडिओग्राफर संस्थेतर्फे कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : फोटो व व्हिडिओद्वारे कोकणचे निसर्गसौंदर्य जगापर्यंत पोहोचू लागले आहे. अद्ययावत कॅमेरे आणि क्षणात शेअरिंग करण्याची संधी असल्याने सर्वजण फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर बनले आहेत. परंतु कलात्मक पद्धतीने, उत्तम फ्रेम, काम्पोझिशन्स, लोकेशन्स, प्लॅनिंग, प्रकाशयोजना, फोटोतील भावना पोहोचल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय पुरस्कार विजेते फोटोग्राफर रंजन झिंगाडे यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा फोटो, व्हिडिओ व्यावसायिकांच्या सहकारी संस्थेतर्फे माळनाका येथे आयोजित निकॉन फोटोग्राफी वर्कशॉपमध्ये ते बोलत होते. या वेळी सुभाष फोटोग्राफिक्सचे शंभू ओऊळकर, निकॉनचे वेस्टर्न रिजनचे मॅनेजर नीरज भाकरे, रितेश पनीकर, मझर पठाण, विकास कोंडे, गुणवंत पिल्लई उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अजय बाष्टे यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री. रंजन यांनी निकॉन मिररलेस कॅमेरा वापरण्याचे तंत्र समजावून सांगितले. फोटोशूट करण्याकरिता प्लॅनिंग महत्त्वाचे आहे. प्री वेडिंग फोटोसाठी काय करावे, कमी जागेचा वापरही करता येऊ शकतो. साध्या-सोप्या गोष्टींमुळेही चांगले फोटोशूट करू शकता, अनाहूतपणे हावभाव टिपता आले पाहिजेत. फोटोग्राफरने प्रयोगशील व सर्जनशील बनले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी संस्थाध्यक्ष अजय बाष्टे यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्हा फोटो, व्हिडिओ व्यावसायिकांची सहकारी संस्था ही जिल्ह्यातील नामवंत संस्था असून संस्थेतर्फे सभासदांसाठी विविध प्रकारची मार्गदर्शक कार्यशाळा वगैरे आयोजित करत आहोत. या संस्थेचे सभासदत्व जिल्ह्यातील सर्व सभासदांनी घ्यावे. आगामी काळात संस्थेतर्फे कार्यक्रम होणार आहेत. जागतिक छायाचित्रण दिनीसुद्धा कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्यात सर्व फोटोग्राफर बंधू-भगिनींनी भाग घ्यावा.

चौकट १
क्रिएटीव्ह कामावर लक्ष द्या
सुरवातीला विवाह व शुभकार्याचे फोटो, व्हिडिओ बनवता बनवता क्रिएटीव्ह बनवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. आता जग मिररलेस कॅमेऱ्यांकडे वळले आहे. त्यातील अद्ययावत तंत्राचा उपयोग आपण करू शकतो. सॉफ्टवेअर्सचा वापर करून एडिटिंग व शेअरिंग करून तुम्ही चांगले नाव मिळवू शकता. सोशल मीडियावर आपल्या फोटोग्राफी व्यवसायाची जाहिरात केलीच पाहिजे, असे श्री. रंजन यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com