महामार्गावरील खड्डे ठरताहेत मृत्यूचे सापळे

महामार्गावरील खड्डे ठरताहेत मृत्यूचे सापळे

३६ (पान ५ साठीमेन)

rat३१p.jpg ः

खेड ः मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे.
------

महामार्गावरील खड्डे ठरताहेत मृत्यूचे सापळे

महामार्ग खड्ड्यात ; वाहनचालकांची सुरक्षितता धोक्यात

खेड, ता. ३१ ः मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरशः चाळणच झाली आहे. महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न कायमच असून हेच खड्डे मृत्यूचे सापळे ठरत असतानाही राष्ट्रीय महामार्ग खाते मात्र अजूनही सुस्तच आहे. ठिकठिकाणच्या खड्ड्यांतून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना अडथळ्यांची शर्यतच पार करावी लागत असून विलंबाच्या प्रवासालाही समोर जावे लागत आहे. दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना यंदाही खड्ड्यांतूनच प्रवास करत गाव गाठावे लागणार आहे.
महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न वर्षानुवर्षे वाहनचालकांच्या जणू काही पाचवीलाच पुजलेले आहे. दरवर्षी खड्ड्यांतूनच गणेशभक्त गाव गाठत असतात. सद्यःस्थितीत महामार्गावरील रस्त्याची झालेली चाळण पाहता गणरायाच्या दर्शनासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना यावर्षीचा प्रवासही खड्ड्यांतूनच करावा लागणार आहे, हे जवळपास निश्चितच आहे. पेण ते इंदापूर या दरम्यानच्या मार्गाची दैनावस्थाच झाली आहे.
जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने हाकताना वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागत आहे. वडखळ, नागोठणे, सुकेळी, कोलाड, इंदापूरपर्यंत कसरतीचाच प्रवास करण्याची नामुष्की वाहनचालकांवर ओढवली आहे. महामार्गावरील भयानक खड्ढे मृत्यूचे सापळेही ठरत आहेत. इंदापूर ते मुंबई या ३ तासांच्या प्रवासाला ५ ते ६ तास मोजावे लागत आहेत. दुसरीकडे दुचाकीवरून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे दिव्यच बनले आहे. याच खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीची समस्याही गंभीर बनली आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याने भर पावसातच जेसीबीच्या साहाय्याने नुसतीच खडी टाकून मलमपट्टीच करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महामार्गावरील ज्या ज्या ठिकाणी खडी टाकून मार्ग सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला जातो त्याच खड्ड्यातील खडी २ ते ३ तासातच उखडत असल्याने पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत आहे. दोनच दिवसापूर्वी खेड दौऱ्यावर आलेल्या अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे पूर्णपणे बुजवून मार्ग सुस्थितीत आणण्याचे संकेत दिले आहेत.
-----

गणेशोत्सवाचा प्रवास खड्ड्यातून

गणेशोत्सव दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवात महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या बेसुमार असते. मात्र, खड्ड्यांच्या विघ्नांमुळे गणेशभक्तांना यंदाही गाव गाठताना अनंत अडथळ्यांना समोर जावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com