असलदे वनराई क्षेत्रात वृक्षारोपण

असलदे वनराई क्षेत्रात वृक्षारोपण

20224
असलदे ः येथील वनराईत वृक्षारोपाणाचा प्रारंभ भाऊ मोरजकर यांच्या हस्ते झाला. शेजारी सचिन परब, भगवान लोके, शामराव परब आदी.

असलदे वनराई क्षेत्रात वृक्षारोपण
कणकवली,ता. ३१ ः असलदेचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर व पावनादेवी मंदिर परिसरातील वनराई क्षेत्रामध्ये वृक्षारोपण सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक आदर्श उर्फ भाऊ मोरजकर यांनी पर्यावरण रक्षणासाठी फळे, फुले व सावली देणाऱ्या विविध प्रकारची ५०० रोपे मोफत उपलब्ध करुन दिली.
असलदेतील गावकऱ्यांनी एकत्र येत श्रीदेव रामेश्वर मंदिर परिसरात आज ५०० रोपे लावून एक समाजासमोर आदर्श निर्माण केला. यावेळी आदर्श उर्फ भाऊ मोरजकर यांनी पुढील ३ वर्षे वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला आहे. असलदे येथील रामेश्वर मंदिर परिसरातील वनराईत आंबा, काजू, जांभुळ, पिंपळ, वड, सोनचाफा, शमी, फणस, बेल, बिबा अशा विविध प्रजातीच्या ५०० रोपांच्या लागवडीचा भाऊ मोरजकर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. या वेळी उपसरपंच सचिन परब, सोसायटी चेअरमन भगवान लोके, संचालक शामराव परब, उदय परब, शत्रुघ्न डामरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे, ग्रामसेवक संजय तांबे, महादेव परब, मारुती घाडी, दिनेश शिंदे, ओमकार परब, विकास परब, दौलत परब, सदाशिव दाभोळकर, अजय परब, सुरज शिंदे, संतोष परब, मधुसुदन परब, प्रकाश वाळके, सुरेंद्र परब, मंगेश चव्हाण, विश्वनाथ परब, बापू परब, सुनिल परब, अनिल परब, मेहूल घाडी आदी या मोहिमेत सहभागी झाले. या वेळी आदर्श मोरजकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत वृक्ष लागवटीसाठी विविध प्रजातीची रोपे उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com