अजित यशवंतराव यांना सरचिटणीसपदाचे नियुक्तीपत्र

अजित यशवंतराव यांना सरचिटणीसपदाचे नियुक्तीपत्र

३९ ( पान ५ साठी )

rat३१p३८.jpg ः
२३M२०२१७
राजापूर ः अजित यशवंतराव यांना प्रदेश सरचिटणीस पदाचे नियुक्तीपत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल. शेजारी आमदार शेखर निकम, बाबाजीराव जाधव आदी.

अजित यशवंतराव यांना
सरचिटणीसपदाचे नियुक्तीपत्र


राजापूर, ता. ३१ ः कोकणातील मोठा जनसंपर्क आणि अभ्यासू नेतृत्व अशी ओळख असलेले अजित यशवंतराव यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते यशवंतराव यांना प्रदेश सरचिटणीसपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी चिपळूण विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम उपस्थित होते.
राज्यामध्ये राजकीय घडामोडी घडत असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही राजकीय भूकंप झाला आहे. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचा एक गट स्वतंत्र कार्यरत झाला आहे. या राष्ट्रवादीच्या गटाकडून राज्यामध्ये संघटन मोर्चेबांधणी करण्याला सुरवात केली आहे. त्याच्यातून संघटनात्मक पद नियुक्ती करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामध्ये विशेषकरून कोकणामध्ये राष्ट्रवादीची संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देशाने कोकणातील युवा आणि अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणूवन ओळखले जात असलेले यशवंतराव यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री पवार व प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य अधिक जोमाने करून संघटनात्मक मोर्चेबांधणी करून दाखवण्याचा विश्‍वास यशवंतराव यांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com