स्वप्नाली सावंत खून प्रकरणाला मोठी कलाटणी

स्वप्नाली सावंत खून प्रकरणाला मोठी कलाटणी

पान १ साठी, ठळक


स्वप्नाली सावंत खून प्रकरणाला कलाटणी
डीएनए अहवाल पॉझिटिव्ह; पोलिसांच्या तपासास मोठे बळ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ ः माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत खून प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी घराजवळून जप्त केलेल्या मानवी अवशेषांच्या डीएनए अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. तो मृतदेह स्वप्नाली सावंत यांचाच असल्याचे डीएनए अहवालात स्पष्ट झाले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन हा खून झाल्याचे जाहीर केले होते. स्वप्नाली सुकांत सावंत यांचा मृतदेह जाळल्यानंतर राख गडबडीत गोणीत भरणे संशयितांना तेव्हा महागात पडले होते. त्यांच्या एका चुकीमुळे पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत तीन दिवसांत या खून प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. मृतदेहाची ६ ते ८ हाडे आणि कुजलेले मांस पोलिसांना सापडले आहे, तसेच एक दातही मिळाला होता. यातील काही अवशेष डीएनए चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते. १ सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता दोरीने गळा आवळून स्वप्नाली सावंत यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह लपवून ठेवून रात्री पेंढा आणि पेट्रोलच्या साहाय्याने जाळून पुरावा नष्ट करण्यासाठी ती राख समुद्रात टाकल्याची कबुली संशयित मुख्य आरोपी सुकांत ऊर्फ भाई सावंत यांच्यासह तिघांनी दिल्याचे डॉ. गर्ग यांनी सांगितले होते.
स्वप्नाली सुकांत सावंत या बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पती सुकांत गजानन सावंत यांनी २ सप्टेंबर २०२२ ला दिली होती. सावंत पती-पत्नीमध्ये खूप वर्षांपासून कौटुंबिक वाद होता. याबाबत पोलिस ठाण्यात परस्परांविरोधात तक्रारीदेखील दाखल आहेत. स्वप्नाली सावंत हिच्याबद्दल यापूर्वीही बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या होत्या. पती-पत्नीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर स्वप्नालीचा घातपात झाला असावा, अशी तक्रार स्वप्नाली सावंत यांची आई संगीता कृष्णा शिर्के यांनी यांनी ११ सप्टेंबरला दिली. त्यामध्ये स्वप्नालीचा पती सुकांत गजानन सावंत, रूपेश उर्फ छोटा भाई सावंत व पम्या ऊर्फ प्रमोद गावणंग या तिघांनी मिळून स्वप्नालीला ठार मारल्याचे सुकांत सांवत याने स्वतः आपल्याला सांगितल्याची लेखी तक्रार त्यांनी दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तपासाला दिशा दिली. तत्कालीन अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी नेतृत्वाखाली ७ तपासपथके तयार केली. गुन्ह्यातील ठोस पुरावे शोधून काढण्याबाबत वेगवेगळी उद्दिष्टे त्यांना दिली. ३ दिवस पोलिसांनी अहोरात्र या प्रकरणाचा तपास सुरू केला.
सुकांत सावंत, तसेच त्याचे साथीदार रूपेश ऊर्फ छोटा भाई सावंत व पम्या ऊर्फ प्रमोद गावणंग यांनी पूर्वनियोजनाने व शांतपणे १ सप्टेंबरला २०२२ स्वप्नाली सावंत हिचा मिऱ्याबंदर येथील घरी दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पेंढ्यामध्ये झाकून लपवून ठेवला होता. अंधार पडल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह घराच्या आवारातच पेंढा आणि पेट्रोलने जाळून टाकला. जाळल्यानंतर उरलेली राख २० बॅगांमध्ये भरून ती समुद्रात टाकून दिल्याचे, तसेच ज्या ठिकाणी तिचा मृतदेह जाळला त्या जागेची साफसफाई केल्याचे उघड झाले. गडबडीत घमेल्याने राख भरताना त्यातील काही हाडे आणि मांस, दात तिथेच पडले होते. आरोपींची ही चूक महागात पडली आणि हा खुनाचा कट उघड झाला. याचा तांत्रिक व पारंपरिक पद्धतीने तपास सुरू आहे. मुलीच्या डीएनएबरोबर हा डीएनए मॅच करण्यासाठी पाठवला होता. पोलिसांनी पाठवलेल्या मानवी अवशेषांचा डीएनए मॅच झाल्याचे पोलिसदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले.

एक चूक पडली महागात
संशयित आरोपी सुकांत सावंत पोलिसांची दिशाभूल करत होता. वर्षभर खुनाचा कट रचून पुरावे नष्ट करण्याचे नियोजन केले होते. त्याप्रमाणे सर्व घडत गेले; मात्र एक चूक त्यांना महागात पडली आणि त्यांचा कट उघड झाला. पोलिसांना मृतदेह जाळलेल्या ठिकाणी ६ ते ८ मानवी हाडे सापडली आहेत, तर बाजूलाच कुजलेल्या अवस्थेत मांस आणि नंतर एक दातही मिळाला होता. यावरून तिथे खून झाल्याचे निष्पन्न झाले..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com