रत्नागिरी-पणदेरीच्या तरूणाचे दहशतवाद्याना दीड वर्ष साह्य

रत्नागिरी-पणदेरीच्या तरूणाचे दहशतवाद्याना दीड वर्ष साह्य

४३ ( पान ३ साठी )

पणदेरीच्या तरुणाची दहशतवाद्यांना मदत

५०० जीबी डाटा ; रासायनिक बॉंम्ब बनविण्याचे साहित्य जप्त
रत्नागिरी, ता. ३१ : पुण्यात एटीएसने अटक केलेले दहशतवादी दीड वर्षांपासून पुण्यात वास्तव्याला असल्याचे तपासात उघड झाले आहे. तर मंडणगड-पणदेरी (जि. रत्नागिरी) येथून अटक केलेला सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७ ) हा दीड वर्षांपासून त्या दोन दहशतवाद्यांना आर्थिक साह्य करत असल्याचे एटीएसच्या तपासात पुढे आले आहे. त्यांच्याकडे ५०० जीबी डाटा सापडला असून यामध्ये मोठ्या शहरातील काही स्थळांच्या गुगल इमेज आहेत. मात्र चित्रीकरणासाठी वापरलेल्या ड्रोनचे इमेज अद्याप हाती लागलेला नाही.
ड्रोनचा फॉरेन्सिक अहवाल अद्याप प्रलंबित आहे, तर दुसरीकडे आतापर्यंतच्या तपासात दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राजकीय नेता किंवा आगामी सण‚ उत्सव नसल्याचे पुढे आले आहे. मात्र त्यांचा उद्देश आणि टार्गेट समजण्यासाठी आणखी काही काळ तपास करावा लागणार आहे. कोथरूड पोलिसांनी वाहनचोरी करताना महम्मद इम्रान मोहंमद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३) आणि मोहंमद युनूस मोहंमद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. मध्य प्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या तपासात दोघेही एनआयने वॉंटेड जाहीर केलेले दहशतवादी निघाले.
दरम्यान, प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला. एटीएसने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी अब्दुल पठाण याला कोंढव्यातून अटक केली. तर त्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी कोंढव्यात राहणाऱ्या मेकॅनिकल इंजिनिअर सिमाब नसरुद्दीन काझी (२७, रा. कौसर बाग, मुळ पणदेरी,मंडणगड ) याला रत्नागिरी येथून अटक केली होती.
तपासादरम्यान त्यांच्याकडे सापडलेले साहित्य आणि केमिकल हे बॉम्ब बनविण्यासाठीच होते. त्याची चाचणी कोल्हापूर, सातारा आणि पुण्यातील जंगलात झाल्याची माहिती बरोबर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याकडे मुंबईतील छाबाड हाऊसचे छायाचित्र सापडले म्हणून ते टार्गेट होते का याचा तपास सुरू आहे. सापडलेल्या ५०० जीबी डाटामध्ये प्रक्षोभक व्हिडिओ, ब्रेनवॉश करणारी भाषणे आणि लेखी साहित्य सापडले आहे.
-------------------
चौकट
ग्राफिक्स डिझायनर फक्त नावालाच

खान आणि साकी स्वत: ग्राफिक्स डिझायनरचे काम करत असल्याचे सांगत आहेत. तरी ते प्रत्यक्षात दहशतवादी कारवायांसाठीच पुण्यात दाखल झाले होते. त्यांना आश्रय देणाऱ्या पठाणचाही ग्राफिक्स डिझायनिंगचा व्यवसाय नसून ते त्याआडून दोघांनाही मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्वत:च्या बचावासाठी तिघांनीही ग्राफिक डिझायनिंग व्यवसायाचा आसरा घेतला.

चौकट
राज्यभर भ्रमंती
खान आणि साकी यांनी राज्यातील अनेक शहरांना भेटी दिल्या आहेत. तेथे ते एकेकदाच गेले आहेत. मात्र, तेथे गेल्यावर त्यांनी राहण्यासाठी कोणते हॉटेल बुक केले नाही. ते जाताना सोबत टेंट घेऊन जात होते. हा टेंट जंगलात किंवा आडबाजूला लावून ते मुक्काम करत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com