महिलांच्या उन्नतीसाठी
‘आई’ पर्यटन योजना

महिलांच्या उन्नतीसाठी ‘आई’ पर्यटन योजना

माहितीचा कोपरा

24766
विनोद दळवी

महिलांच्या उन्नतीसाठी
‘आई’ पर्यटन योजना

लीड
पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग त्यांच्या आर्थिक विकासाकरिता एक चांगले साधन ठरू शकते. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आई’ हे महिला केंद्रित, लिंग समावेशक पर्यटन धोरण राज्य शासनाने जाहीर केले आहे. याचा फायदा घेऊन महिलांना पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती साधण्याची संधी राज्याने उपलब्ध करून दिली आहे.
- विनोद दळवी
....................
‘पंचसूत्री’चा समावेश
राज्याने महिलांसाठी निर्माण केलेल्या ‘आई’ पर्यटन धोरणाची पंचसूत्री तयार केली आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला केंद्रित, लिंग समावेशक पर्यटन धोरण आखताना महिला उद्योजकता विकास, महिलांसाठी पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज उत्पादने आणि सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास या पाच सूत्रांचा यात समावेश आहे. यासाठी कार्यदलाची स्थापना केली आहे. पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यदल समिती राहणार आहे. नियोजन, वित्त, पर्यटन, महिला व बाल विकास, कौशल्य व रोजगार विकास या विभागाच्या सचिवांचा यात समावेश केला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, पर्यटन संचालनालयचे संचालकांचाही यात समावेश केला आहे.
.................
नोंदणी बंधनकारक
महिला पर्यटक व्यावसायिकांना हा लाभ मिळण्यासाठी आपला पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनायाकडे नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे. पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालविलेला असला पाहिजे. महिलांच्या मालकीच्या हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे बंधनकारक आहे. पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवाना प्राप्त असणे गरजेचे आहे. कर्जाचे हप्ते वेळेत भरले, तरच शासनाच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे.
.................
प्रोत्साहने व सवलती
या योजनेंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने प्रोत्साहने व सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे औरंगाबाद येथील पर्यटक निवास राज्यातील प्रथम पूर्णतः महिला संचलित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सीचे ‘अर्का रेस्टॉरंट’ पूर्णतः महिला संचलित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या टूर ऑपरेटरमार्फत आयोजित पर्यटन सर्किट पॅकेजेसमध्ये महिला पर्यटकांना २० टक्के सूट देण्यात येणार आहे. या २० टक्के सवलतीची रक्कम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे टूर ऑपरेटरला दिली जाणार आहे. याकरिता होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास शासनाकडून करण्यात येणार आहे.
...................
महिलांसाठी टूर पॅकेजेस
सर्व महिला पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट, युनिट्समध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त १ ते ८ मार्च या कालावधीत व वर्षभरात इतर २२ दिवस अशा प्रकारे एकूण ३० दिवस केवळ ऑनलाईन बुकिंगमध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी महिला बचतगटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आदींच्या विक्रीसाठी स्टॉल, जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचबरोबर महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेसही उपलब्ध करून दिली आहेत. महिला केंद्रित पर्यटन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. एकंदरीत ‘आई’, या महिला पर्यटन धोरणातून राज्य शासनाने महिला पर्यटन व्यावसायिक व महिला पर्यटक वाढावेत, यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेला दिसतो.
...................
कोट
राज्य पर्यटन विभागाने पर्यटन विकासासाठी विविध धोरणे आखण्यास सुरुवात केली आहे. यातीलच ‘आई’ हे महिला पर्यटन धोरण आहे. हे पर्यटन धोरण राज्याच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वाचे ठरणारे आहे. पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या अथवा नव्याने येऊ इच्छित असलेल्या महिलांना प्रोत्साहन, बळ देणारे हे धोरण आहे. महिला पर्यटन व्यावसायिक घडवितानाच महिला पर्यटक वाढावे, यासाठी सवलती देण्यात येत आहेत. ज्येष्ठ महिला, दिव्यांग महिला यांचा यात समावेश आहे.
- हनुमंत हेडे, कोकण विभागीय उपसंचालक, पर्यटन संचालनालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com