दोनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दोनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

२५ (टूडे पान २ साठी)

rat२१p५.jpg ः
P२३M२४७७९
रत्नागिरी ः साखपा येथील तिल्लोरी कुणबी समाजातर्फे विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित मान्यवर.
-----

दोनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

तिल्लोरी कुणबी समाज ; खडी कोळवण, देवळे ते चोरवणे पंचक्रोशी


रत्नागिरी, ता. २१ ः साखरपा (ता. संगमेश्वर) येथील तिल्लोरी कुणबी समाजातर्फे पंचक्रोशीतील खडी कोळवण, देवळे ते चोरवणे या २६ गावातील दहावी-बारावीतील २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. विद्यार्थ्यांना सत्कारबरोबरच पुढील शिक्षण व नोकरीबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी करिअर गाईडन्स ठेवण्यात आले होते.
रमेश गोताड यांनी याबाबत योग्य आणि उपयुक्त मार्गदर्शन करताना गुण कमी असले तरी खचून न जाता पुढच्या संधीचा फायदा कसा घेता येईल, याचा विचार करा. आपले आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी कसे होता येते, याचे उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. या वेळी साखरपा पंचक्रोशीमध्ये दहावीत ९३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अमेय घाणेकर याचा सत्कार करण्यात आला. अॅड. संदीप ढवळ यांनी विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी आवश्यक गुणांची चर्चा करताना सध्या समाजाच्या पुढे अडचणीचा विषय म्हणजे जातीचा व जातपडताळणी दाखला याची कारणे सांगताना आपण काय कारायला पाहिजे यांचे मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी विष्णू रामाणे यांनी मुले-मुली व पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. या वेळी २०० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बापू ढवळे यांनी केले तर सुत्रसंचालन यशवंत घागरे यांनी केले. या वेळी कोंडगाव सरपंच प्रियंका जोयशी, दाभोळे गावचे सरपंच राजाराम रेवाळे, गणपत भोसले, गणपत भायजे, दिनेश करंबेळे, कनकाडीचे सरपंच संतोष गोताड, दत्ताराम घुमे, कमलेश म्हवळणकर, गंगाराम जोयशी, शिवाजी पाष्टे, रावण गुरूजी, प्रकाश जायगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com