कामगार केंद्रात स्वातंत्र्यदिन उत्साहात

कामगार केंद्रात स्वातंत्र्यदिन उत्साहात

१२ (पान २ साठी)

-------

कामगार केंद्रात स्वातंत्र्यदिन उत्साहात

रत्नागिरी ः महाराष्ट्र कामगार मंडळाच्या येथील कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी येथे स्वातंत्र्य अमृत महोत्सवाअतंर्गत स्वातंत्र्य दिन उत्साहात झाला. सकाळी सव्वाआठ वाजता ध्वजवंदन कार्यक्रम प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांच्या हस्ते झाला. या वेळी भारत सावंत, सुजाता भालेकर, गुणवंत कामगार व कार्यक्रम अध्यक्ष रमाकांत पांचाळ, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी निधी सावंत, ऋतुजा पारटे, समीर शिंदे, कामगार आदी उपस्थित होते. मिलिंद कीर यांनी केंद्राचे कार्य, उपक्रम यांचे कौतुक केले. सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. केंद्र महिला कल्याण सहाय्यिका संस्कृती शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पूजा नागवेकर यांनी सहकार्य केले.
------------

-rat१८p१६.pg ः
KOP२३M२४१२९
संदीप राजपुरे
---------
संदीप राजपुरेंची कार्यकारी परिषदेवर नियुक्ती

दाभोळ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेवर प्रगतीशील शेतकरी या प्रवर्गातून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व दापोली तालुक्यातील प्रगतशील शेतकरी संदीप राजपुरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दापोली येथे दिली. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम, १९८३ मधील कलम ३० (१) (नऊ) मधील तरतुदीनुसार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेवर प्रगतीशील शेतकरी या प्रवर्गातून कुलपति तथा राज्याचे कृषिमंत्री यांनी संदीप राजपुरे यांची पुढील आदेश होईपर्यंत पण जास्तीत जास्त तीन वर्षांचा कालावधीकरिता नियुक्ती केली आहे. यापूर्वी २ वेळा कोकणाबाहेरील प्रगतीशील शेतकऱ्यांची कोकण कृषी विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याने कोकणातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
.------

-rat१८p२९.jpg-
: KOP२३M२४१४८
लांजा ः हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित क्रांती गाथा प्रदर्शन पाहण्यासाठी झालेली गर्दी.
---------
हिंदू जनजागृती समितीतर्फे
सहा ठिकाणी क्रांती गाथा प्रदर्शन

रत्नागिरी ः जिल्ह्यात हिंदू जनजागृती समितीअंतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून समितीच्या कार्याशी जोडलेले धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या साहाय्याने सहा ठिकाणी क्रांतिगाथा प्रदर्शनाचे आयोजन केले. लांजा, रत्नागिरी, सावर्डे आणि चिपळूण येथे हे प्रदर्शन भरवले होते. आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या यज्ञात आहुती दिलेले क्रांतिकारक, त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेला त्याग याविषयी माहिती सर्वांना व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन भरवले. त्याचा लाभ महाविद्यालयातील १ हजार ११२ युवकांनी घेतला. प्रदर्शन पाहिल्यानंतर मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी सांगितले की, यापूर्वी आम्हाला इतक्या वर्षात क्रांतिकारक म्हणजे कोण, त्यांनी काय केले हे ठाऊक नव्हते. समितीच्या या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली. ही माहिती आम्ही आमच्या मित्रपरिवाराला सांगण्याचा प्रयत्न करू. हे प्रदर्शन विविध भागांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com