नव्या गायकांची वाटचाल आश्‍वासक

नव्या गायकांची वाटचाल आश्‍वासक

24853
कणकवली : येथील निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोहामध्ये सहभागी युवा गायक, वादक.

नव्या गायकांची वाटचाल आश्‍वासक

अभय खडपकर : निवृत्ती दाभोळे संगीत समारोह उत्साहात

कणकवली, ता.२१ : कै निवृत्ती दाभोळे यांनी आपल्या स्वरसाधनेतून रसिकांच्या मनात उत्तुंग स्थान निर्माण केले. अनेक शिष्य घडविताना चांगले श्रोतेही निर्माण केले. आज सिंधुदुर्गातील युवक कलाकारांनी त्यांची स्मृती जागवली आहे. गुरु शिष्य परंपरेतून या गायकांची पुढील वाटचाल आश्वासक आहे, असे प्रतिपादन अभिनेते अभय खडपकर यांनी येथे केले.
शहरालगतच्या श्रीदत्तक्षेत्र आशिये येथे निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोह कार्यक्रम झाला. यात श्री.खडपकर बोलत होते. गंधर्व फाउंडेशन आणि दाभोळे शिष्य परिवारातर्फे हा कार्यक्रम झाला. या समारोहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा कलाकार पर्णा नायगावकर हिने ‘कौसल्येचा राम’, पारवी नायगावकर हिने ‘खेळ मंडियेला’, अनुष्का आपटे हिने ‘कानडा राजा पंढरीचा’, काव्या गौंडळकर हिने ‘निर्गुणाचा संग’, स्वरांगी गोगटे हिने भिमपलास राग, नाट्यपद, पद्मनाभा नारायणा पद सादर केले. वेदांत कुयेस्कर याने एकल तबला वादन केले. हर्ष नकाशे याने विविधांगी श्रवणीय गायन केले. संवादिनी वर संदीप पेंडूरकर, धनंजय प्रभुदेसाई यांनी तर तबला साथ वेदांत कुयेस्कर अरुण केळुसकर यांनी केली. कुकारो साउंडने उत्तम ध्वनीप्रक्षेपण केले.
यावेळी अभय खडपकर, बाळ नाडकर्णी, मुकुंद खानोलकर, गंधर्व फाउंडेशनचे मनोज मस्त्री, भूषण बुचडे, संतोष सुतार, संदीप पेंडूरकर, किशोर सोगम, सागर महाडिक, संतोष कांबळे, डॉ मुक्तानंद गौंडळकर, दामोदर खानोलकर, धीरेश काणेकर, गिरीश सावंत, तसेच विश्रांती कोयंडे, गुरु पावसकर, संतोष वायगणकर, नारायण देसाई, तेजस्विता पेंडुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. संजय कात्रे यांनी सूत्रसंचलन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com