जालगावच्या ग्रामसभेत सारथी योजनांची माहिती

जालगावच्या ग्रामसभेत सारथी योजनांची माहिती

२९ (पान २ साठी)


-rat२१p१९.jpg ः
२३M२४८१४
जालगाव ः सारथीच्या योजनांचे माहितीपत्रक सरपंच अक्षय फाटक यांना देताना लाभार्थी विद्यार्थी.
-----------

जालगाव ग्रामसभेत ‘सारथी’चे मार्गदर्शन

दाभोळ, ता. २१ ः छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था (सारथी) ही मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी कार्यरत आहे. जालगाव ग्रामपंचायत येथे ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेचे औचित्य साधून सारथी संस्थेमार्फत विविध योजनांची माहिती सारथीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी ग्रामसभेत दिली.
सारथी संस्था देत असलेल्या संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा मार्गदर्शन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा मार्गदर्शन, इतर महत्वाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, एमफील/पीएचडी विद्यार्थ्यांना अधिछत्रवृत्ती, सारथी विकास कौशल्य कार्यक्रम, दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना परीक्षा, २०२३-२४ मध्ये सारथीमार्फत घेण्यात येणारे काही उपक्रम, कृषिमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना, सारथीमार्फत प्रकाशित करण्यात आलेले साहित्य याची माहिती देण्यात आली. सभेला सरपंच अक्षय फाटक, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, गावसई अध्यक्ष अशोक जालगांवकर, गावसई उपाध्यक्ष रमेश कडू, चारूता कामतेकर, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्यासह सुमारे १४० ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. प्रीती शिगवण, ज्ञानेश्वर इंगोले, अवधुत वाळेकर, पवनकुमार सहाणे, सागर पाटील, सौरभ आयरे, सुनील किनगे, श्रीरंग टेमके आणि ऐश्वर्या आखरे या पीएचडीसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व सारथीच्या योजनांचे चावडीवाचन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com