अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीसाठी हर्णैत यज्ञ

अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीसाठी हर्णैत यज्ञ

३० (पान २ साठी, अॅंकर)
(टीप- दोन्ही फोटो घ्यावेत.)

-rat२१p२१.jpg ः
२३M२४८२३
हर्णै ः श्रीराम यज्ञाच्या पूजेसाठी विराजमान झालेले प्रत्येक वाडीपेठेतील यजमान.
-rat२१p२२.jpg ः
२३M२४८२४
श्रीराम यज्ञामध्ये एकत्रित आहुती देताना ग्रामस्थ.
----------

अयोध्येत श्रीराम मंदिर निर्विघ्न उभारणीसाठी हर्णैत यज्ञ

पहिलाच उपक्रम ; १३ लाख जपाचा संकल्प पूर्ण

हर्णै, ता. २१ ः अधिक महिन्याचे औचित्य साधून प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत (अयोध्या) निर्माणाधीन असलेले भव्यदिव्य श्रीराम मंदिर निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे, या उद्देशाने हर्णैमधील सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन श्रीराम यज्ञ करण्याचा आखलेला संकल्प दिमाखात पूर्ण केला. अवघ्या महाराष्ट्रात वाखाणण्यासारखा कार्यक्रम हर्णै गावामध्ये झाला.
हर्णै गावामध्ये पहिल्यांदाच असा मोठा कार्यक्रम आयोजित केल्याने उत्साह होता. या संकल्पानिमित्त श्रीराम जयराम जयजय राम हा १३ अक्षरी बिजमंत्राचा १३ लाख नामजप करण्याचे ठरले होते. त्या जपाची सुरवात १८ जुलैपासून झाली. हर्णैमध्ये एकूण २६ वाडी, पेठा, आळी, नगरांमध्ये सर्व जातींच्या ग्रामस्थांचा समावेश होता. या प्रत्येक ठिकाणच्या ग्रामस्थांनी आवडीने आपापल्या मंदिरात, सभागृहात, कोणाच्या घरी अशा प्रकारे सामूहिक जपाचे आयोजन केले होते. बहुसंख्येने एके ठिकाणी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात ''श्रीराम जयराम जय जय राम'' या नामाचा जप केला जात होता. बहुसंख्य ग्रामस्थांनी १३ लाख जप पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक घरामध्येदेखील जप केला. प्रत्येक ठिकाणी हर्णैमधील पुजारी भास्कर जोशी व त्यांचे सहकारी एकता मंचाचे सेक्रेटरी चंद्रशेखर विलणकर स्वतः आत्मियतेने हजर राहून जप कसा करायचा, याची माहिती देत होते. प्रत्येक ठिकाणी किमान दीड ते दोन तास जप चालत होता. जप पूर्ण झाल्यानंतर प्रसाद वाटून त्या ठिकाणच्या जपाची सांगता होत होती. असे १३ लाख जप पूर्ण होईपर्यंत सुरू होते. अधिक महिना हा विष्णूचा महिना समजला जातो. या महिन्यातच हा संकल्प पूर्ण करण्याचे ध्येय पुजारी जोशी यांनी ग्रामस्थांसामोर ठेवले होते. अधिक मासानिमित्त संपूर्ण महिनाभर संपूर्ण गावामध्ये व प्रत्येक घराघरांमध्येदेखील श्रीराम जयराम जय जय राम जपाचा नाद घुमत होता. या वेळी जपाची सांगता करण्यासाठी श्रीराम यज्ञ व १३ लक्ष जपाचे दशांश हवनाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्यदिव्य सोहळ्याला गावातील प्रत्येक वाडीपेठेतून एक यजमानाची पूजेकरिता नेमणूक करण्यात आली होती. हा कार्यक्रम पाडण्यासाठी बारावाडी सत्कार्य मंडळ, हर्णै पंचक्रोशी मंडळ, हर्णै कोळीबांधव समाजमंडळ, हर्णै पाळंदे एकता विचारमंच यांनी एकत्रितपणे बहुमोलचे सहकार्य केले.
------------------

अधिक महिन्यात धार्मिक वातावरण

हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत होत असलेले श्रीराम मंदिर निर्विघ्न पणे पूर्ण व्हावे या उद्देशाने आम्ही हर्णैमध्ये श्रीराम यज्ञ केला. सर्व हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन महिनाभर श्रीराम जयराम जय जय राम नामाचा जप केला आणि त्याची सांगता श्रीराम यज्ञाने केली. यामुळे गावामध्ये अधिक महिन्यात चांगले धार्मिक वातावरण निर्माण झाले होते, असे हर्णै पाळंदे एकता विचारमंचाचे अध्यक्ष भालचंद्र मुसलोणकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com