देवरुखात बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात

देवरुखात बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात

३१ (पान २ साठी)


-rat२१p१६.jpg ः
P२३M२४८०१
साडवली ः देवरूख बॅडमिंटन स्पर्धेवेळी शुभेच्छा देताना प्रद्युम्न माने.
---------

देवरुखात बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात

साडवली, ता. २१ ः रवींद्र माने यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त देवरूख बॅडमिंटन असोसिएशन आयोजित प्रद्युम्न माने पुरस्कृत चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स बॅडमिंटन लीग व लहान मुलांच्या एकेरी व मिश्र दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुलभाताई आपटे क्रीडासंकुलात झाल्या.
स्पर्धेचे उद्घाटन नेहा माने यांच्या हस्ते व बक्षीस समारंभ प्रद्युम्न माने यांच्या हस्ते झाला. बास्टचे अध्यक्ष मंगेश प्रभुदेसाई व सर्व सदस्य, बॅडमिंटन रसिक, बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. ही स्पर्धा एकूण चार गटात खेळवण्यात आली. १४ वर्षांखालील गटात अनय भोजने हा विजेता व आर्या यशवंतराव ही उपविजेती ठरली. १७ वर्षांखालील गटात व्यंकटेश फटकरे हा विजेता व पार्थ तांदळे हा उपविजेता ठरला. मिश्र दुहेरी गटात वरद शिंदे, ऐश्वर्या प्रसादे ही जोडी विजेती व हरेश पटेल व भाग्यश्री हळमनी ही जोडी उपविजेती ठरली. यानंतर सर्वात महत्वाची चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स बॅडमिंटन लीग स्पर्धा यामध्ये सेव्हन स्टार्स डॉ. विशाल आंबेकर, अवधूत मेस्री, वरद शिंदे, अथर्व गिड्ये, डॉ. विनय ढवळ, महेंद्र जाधव व डॉ. राजकुमार इंगळे या संघाने विजेतेपद तर बॅडमिंटन लव्हर्सचे दिलिप विंचू, नीलेश चव्हाण, सार्थक नलावडे, मनोज मंथारा, मंगेश प्रभुदेसाई, रवी कदम व आशिष प्रभुदेसाई यांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. मालिकावीर म्हणून वरद शिंदे ठरला तसेच इला आंबेकर हिने शैक्षणिक, सान्वी भुरवणे हिने चित्रकला, सोहम प्रभुदेसाई याने पंचपरीक्षेत व कृष्णात जाधव यांनी क्रीडाप्रकारात विशेष प्रावीण्य मिळवण्याकरिता सर्वांचे सत्कार करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com