केरवडे शाळेत आज
प्रयोगशाळेचे उद्‍घाटन

केरवडे शाळेत आज प्रयोगशाळेचे उद्‍घाटन

केरवडे शाळेत आज
प्रयोगशाळेचे उद्‍घाटन
कुडाळ, ता. २१ ः केरवडे तर्फ माणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकसहभागातून उभारलेल्या संगणक व प्रयोगशाळेचे उद्‍घाटन उद्या (ता. २२) सकाळी साडेदहाला करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार असून, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर अध्यक्षस्थानी आहेत.
कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, उद्योजक योगेश नाडकर्णी, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, घावनळे केंद्रप्रमुख सी. डी. पवार, दशरथ कोरगावकर, केरवडे ग्रामोन्नती मंडळ, मुंबईचे अध्यक्ष गोपाळ परब, केरवडे सरपंच श्रीया ठाकूर, उपसरपंच अर्जुन परब यांची प्रमुख उपस्थिती आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक गवस, व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद नाईक व अमृत महोत्सव संयोजन समिती अध्यक्ष विलास परब यांनी केले आहे.
..............
‘ओरटीओ’तर्फे आरोग्य शिबिर
सिंधुदुर्गनगरी, ता. २१ ः जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत २१ ते २५ ऑगस्ट या कालावधीत दररोज देवगड, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या एसटी आगारात व गोवा-पुणे-मुंबई या मार्गावर चालणाऱ्या खासगी प्रवासी बसेसच्या चालकांसाठी झाराप येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत नेत्र चिकित्सा करण्यात येणार आहे. दृष्टीदोष आढळल्यास आवश्यकतेनुसार मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे. गंभीर दोष असल्यास शिफारस पत्र देऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. सर्व प्रकारच्या बसचालकांनी आरोग्य व नेत्र तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com