स्टेट बँकेच्या सेवेत सुधारणा करू

स्टेट बँकेच्या सेवेत सुधारणा करू

24886
कट्टा : येथील जिल्‍हा व्यापारी महासंघ आणि स्टेट बँक यांच्या संयुक्‍त मेळाव्यात बोलताना स्टेट बँकेचे उपमहाप्रबंधक सुजीत अंबुलकर. शेजारी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, नितीन तायशेटे, संजय भोगटे, नंदन वेंगुर्लेकर आदी.


स्टेट बँकेच्या सेवेत सुधारणा करू

सुजित आंबुलकर : कट्टा येथे व्यापारी, बँक व्यवस्थापकांची बैठक

कणकवली, ता.२१ : स्टेट बँकेकडून दिल्‍या जाणाऱ्या ग्राहक सेवेतील त्रुटींबाबत व्यवस्थापनाला जाणीव आहे. पुढील काळात यामध्ये निश्‍चितपणे सुधारणा दिसतील. व्यापारी महासंघाने सुचिवलेल्‍या सूचना अंमलात आणण्याच्या दृष्‍टीने कार्यवाही करू, अशी ग्‍वाही स्टेट बँकचे रत्‍नागिरी येथील उपमहाप्रबंधक सुजीत अंबुलकर यांनी दिली.
व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग आणि कणकवली तालुका व्यापारी संघातर्फे जिल्ह्यातील सर्व स्टेट बँक शाखा व्यवस्थापक आणि अधिकाऱ्यांचा मेळावा कट्टा येथील गणेश मंगल कार्यालयात आज झाला. अध्यक्षस्थानी जिल्‍हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर होते. तर स्टेट बँकेचे उपमहाप्रबंधक सुजीत अंबुलकर यांच्यासह प्रवीण शेवडे, व्यापारी महासंघाचे नितीन तायशेटे, संजय भोगटे, नंदन वेंगुर्लेकर, विलास कोरगांवकर, राजा राजाध्यक्ष, निलेश धडाम, विवेक नेवाळकर, नितीन वाळके आदी उपस्थित होते. या मेळाव्यात व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेट बँकेडून मिळणाऱ्या अत्यंत हीन वागणुकीबाबत तीव्र संताप व्यक्‍त केला.
स्टेट बँकेचे श्री.अंबुलकर यांनी सर्व व्यापारी प्रतिनिधींच्या समस्या आणि सूचना ऐकून घेतल्या. त्‍यानंतर स्टेट बँकेकडून उच्च दर्जाची ग्राहक सेवा दिली जाईल आणि या बँकेशी जिल्ह्यातील सर्व व्यापारी जोडले जातील, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.
व्यापारी आणि स्टेट बँक अधिकारी यांच्यात झालेल्‍या चर्चेवेळी बॅंकेच्या महाप्रबंधक श्रीमती ग्रेस यांनी उत्तर देताना, ग्राहक सेवेतील असंख्य अडचणी असतांनाही व्यापारी बांधवांनी ज्या पोटतिडकीने भावना मांडल्या त्यातून त्यांची स्टेट बॅंकेबद्दलची आपुलकीच दिसून येते, असे प्रतिपादन केले. तसेच या आपुलकीचा सन्मान करून स्टेट बॅंक व सिंधुदुर्गातील व्यापारी बांधव यांच्यातील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी बांधील असल्‍याचे स्पष्‍ट केले. या मेळाव्यात व्यापारी बांधवांनी स्टेट बँकेकडून अल्प प्रीमियममध्ये विमा संरक्षण, शाखा तेथे ई गॅलरी, प्रत्येक शाखेत विभागीय कार्यालयाचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करणे, ग्राहकांशी संबंधीत प्रत्येक कामासाठी लागणाऱ्या वेळेचा तक्ता आणि नागरिकांची सनद असा फलक ठळकपणे दिसेल, अश्या ठिकाणी लावणे, पुरेशा प्रमाणात व आवश्यकतेनुसार सुट्टी नाणी उपलब्ध करून देणे आदी सूचना केल्या.
--
व्यापाऱ्यांकडून काही मागण्या
दरम्यान, शाखानिहाय जनसंपर्क अधिकारी उपलब्ध करून देणे, एटीएमची परिस्थिती सुधारणे, ज्‍येष्ठ व आजारी ग्राहकांसाठी घरपोच बॅंकींग सेवा उपलब्ध करून देणे, जिल्ह्यातील सर्व शाखांत पैसे भरण्याची सयंत्रे उपलब्ध करून देणे, गृहकर्जासाठी आवश्यक सर्च रिपोर्टची फी बॅंकेमार्फतच अदा केली म्हणजे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही तसेच कर्ज प्रक्रिया सुलभ होण्यासाठी कार्यवाही करणे आदी सूचना व्यापारी बांधवांकडून मांडण्यात आल्‍या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com