बसस्थानकांची कामे रखडल्याने न्यायालयाने फटकारले

बसस्थानकांची कामे रखडल्याने न्यायालयाने फटकारले

३४ (पान २ साठीमेन)

बसस्थानक कामाबाबत न्यायालयाने फटकारले

महिनाअखेर प्रतिज्ञापत्र सादर करा ; राज्य परिवहन महामंडळाला आदेश; गणेशोत्सवात गैरसोय नको

चिपळूण, ता. २१ ः चिपळूण, रत्नागिरी व लांजा येथील रखडलेल्या हायटेक बसस्थानकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ॲड. ओवेस पेचकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. कामाची मुदत संपलेली असतानाही अद्याप बसस्थानक उभारणीची कामे पूर्णत्वास गेली नसल्याने न्यायालयाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला फटकारले आहे. या संदर्भात ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश दिले आहेत. गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी तातडीने सोयी-सुविधाही उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, रत्नागिरी व लांजा या तीन ठिकाणी एस‍टी महामंडळामार्फत हायटेक बसस्थानके उभारण्याचे काम सुरू आहे; मात्र कामाची मुदत टळून गेली तरीही संबंधित ठेकेदारांना ही बसस्थानके उभी करण्यात यश आलेले नाही. चिपळुणात नवीन बसस्थानकाचा साधा पायासुद्धा पूर्णत्वास गेलेला नाही. या बसस्थानकांची कामे रखडल्याने प्रवासीवर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवासी निवाराशेड नसल्याने उन्हापावसात प्रवाशांना ताटकळत बसची वाट पाहावी लागत आहे. याशिवाय अन्य सुविधांपासूनही प्रवासी वंचित राहत आहे. या सर्व गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी उच्च न्यायालयातील ॲड. ओवेस पेचकर यांनी पुढाकार घेत गतवर्षी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्ये व आरिफ डॉक्टर यांच्या खंडपिठासमोर शुक्रवारी (ता. १८) तातडीची सुनावणी झाली. या सुनावणीत ॲड. पेचकर यांनी चिपळूण बसस्थानकाच्या कामाची मुदत २०१९ ला, रत्नागिरी बसस्थानकाची मुदत २०२१ तर लांजातील कामाची मुदत दोन वर्षापूर्वीच संपली आहे. तरीही ही कामे अद्याप पूर्णत्वास गेलेली नसून परिस्थिती जैसे थे आहे. यावर न्यायालयाने एसटी महामंडळाचे वकील नीलेश बुटेकर यांना काम का पूर्ण केले नाही, अडचण काय, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी चिपळूण बसस्थानक कामाची माहिती देताना कोविडचे कारण देत नवीन ठेकेदार नेमणुकीसंदर्भात माहिती दिली. यावर ॲड. पेचकर यांनी आक्षेप घेत कोविडनंतरही या बसस्थानकांची कामे रखडल्याचे फोटोसह न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या वेळी ॲड. बुटेकर यांनी आम्ही रत्नागिरी एस‍टी विभागीय कार्यालयाकडून माहिती घेऊ, अशी विनंती केली; मात्र या वेळी न्यायालयाने त्यांना फटकारत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मॅनेजिंग डायरेक्टरने ३१ ऑगस्टपर्यंत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे. प्रवाशांना ज्या मुलभूत सुविधा आवश्यक आहेत त्या तातडीने उपलब्ध कराव्यात, असे आदेश दिले असल्याची माहिती ॲड. पेचकर यांनी दिली.
------

कोकणाबाबत नेहमीच दुजाभाव का?

चिपळूण व रत्नागिरी बसस्थानकाचा दर महिन्याला जवळपास दहा लाख प्रवाशी आधार घेतात. महिलांना एसटी तिकिटामध्ये ५० टक्के सवलत मिळाल्याने एसटी डेपोतील प्रवासीसंख्येचा ताण वाढला आहे. असे असतानाही या परिसरात प्रवाशांसाठी तात्पुरती निवाराशेड, टॉयलेटसह अन्य सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत, असे म्हणणे मांडतानाच कोकणाबाबत नेहमीच असा दुजाभाव का? असा प्रश्नही ॲड पेचकर यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com