बांदा शहरासह परिसरातील
परप्रांतीयांची चौकशी करा

बांदा शहरासह परिसरातील परप्रांतीयांची चौकशी करा

२४९१४

बांदा शहरासह परिसरातील
परप्रांतीयांची चौकशी करा
मनसेची मागणी; पोलिस निरीक्षकांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २१ ः शहरात परप्रांतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. यात बांधकाम मजूर, भंगार गोळा करणारे, फेरीवाले जास्त प्रमाणात असून हे लोक शहरात भाड्याची खोली घेऊन राहतात. दिवसा हे लोक गावात कामधंद्याच्या निमित्ताने फिरतात. जबाबदार नागरिक म्हणून मागच्या काही दिवसांत अशा फेरीवाल्यांची चौकशी केली असता व त्यांच्याकडे आधार कार्डची मागणी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पळ काढला. रात्रीच्या वेळी हेच लोक मद्यधुंद अवस्थेत धुडगूस घालताना दिसतात. त्यामुळे त्यांचे वागणे संशयास्पद वाटते. या परप्रांतीयांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बांदा माजी विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी येथील पोलिसांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलिस निरीक्षक शामराव काळे यांना निवेदन दिले. शहरात वाढत्या चोरीची प्रकरणे लक्षात घेता सतर्कता म्हणून घरमालकांना भाडेकरू ठेवताना भाडेकरारनामा सक्तीचा करावा. रात्री शहरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी केली.
यावेळी माजी विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत, माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे, विजय बांदेकर, चिन्मय नाडकर्णी, जय पटेकर, प्रथमेश पडवळ, अमोल सावंत, तुषार देसाई आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com