डॉ. रंगनाथ जयंती

डॉ. रंगनाथ जयंती

२७ (पान ५ साठी, संक्षिप्त)

दापोली अर्बन महाविद्यालयात डॉ. रंगनाथन जयंती

दाभोळ ः दापोली शिक्षणसंस्था संचालित दापोली अर्बन बँक सीनिअर सायन्स महाविद्यालयाच्या भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या वेळी महाविद्यालयाच्या मागासवर्गीय पुस्तकपेढी योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पुस्तकसंचाचे वितरण प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथपाल कीर्ती परचुरे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसह डॉ. विक्रम मासाळ, डॉ. गंगा गोरे, प्रा. कैलास गांधी, डॉ. नंदा जगताप, प्रा. प्रियांका साळवी, प्रा. सुजित टेमकर, प्रा. अनिरुद्ध सुतार आदी प्राध्यापक उपस्थित होते.
-------
सलग स्केटिंग करत क्रांतिकरांना मानवंदना

दाभोळ ः ७७व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ईगल स्केटर्स क्लब, दापोलीचे खेळाडू प्रद्युम्न दाभोळे, सई महाडीक व जैद बालाभाई यांनी आपली भारतमाता आणि क्रांतिकारकांसाठी स्वातंत्र्यदिनी वंदे मातरम म्हणत न थांबता एक तास स्केटिंग करत होप इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड, वज्र वर्ल्ड रेकॉ़र्ड, द मिरॅकल रेकॉर्डस, इंडिया, ग्लोबल जीनियस रेकॉर्डस् हे चार रेकॉर्ड यशस्वीरित्या पूर्ण केले. या तिघांचा उत्साह वाढवण्यासाठी साहिल गडदे याने या खेळाडूंसोबत रेकॉर्ड पूर्ण होईपर्यंत स्केटिंग केले. ७७व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत भारतातील विविध राज्यातून १ हजार २०० स्केटिंग खेळाडूंनी एकाचवेळी सर्वत्र आपापल्या शहरात संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत राष्ट्रध्वज हातात घेऊन वंदे मातरम म्हणत हे चार रेकॉर्ड यशस्वीरित्या पूर्ण केले. चारही रेकर्ड यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रद्युम्न दाभोळे, सई महाडीक व जैद बालाभाई यांना जिल्हा परिषद शाळा आगरवायंगणी माजी मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक चंद्रकांत उजाळ यांच्या हस्ते मेडल देऊन गौरवण्यात आले. या तिन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथमेश दाभोळे यांनी मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com