दांडेलीत कृषिदुतांमार्फत कृषी सेवा केंद्र

दांडेलीत कृषिदुतांमार्फत कृषी सेवा केंद्र

24936
दांडेलीत कृषिदुतांमार्फत कृषी सेवा केंद्र
बांदा ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या कार्यानुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत दांडेली गावामध्ये कृषिदुतांमार्फत कृषी माहिती सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. दांडेली ग्रामपंचायत येथे झालेल्या या कार्यक्रमात सरपंच नीलेश आरोलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच दादा पालयेकर, ग्रामसेवक श्रीधर राऊत, ग्रामपंचायत सदस्य उमा पांगम, प्रगतशील शेतकरी दीपक नाईक, अशोक सिद्धयी आदींसह शेतकरी उपस्थित होते. प्रगतशील शेतकरी नाईक व सिद्धयी सरपंच आरोलकर यांनी विद्यार्थी, शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले. ग्रामसेवक राऊत यांनी विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समीर भांडळे, गीतक वळंजू, अमोल गोसावी, मनन पटेल, रोहन पवार, दीप महाडकर यांनी विशेष मेहनत घेतली.
--
24934

पनवेलला बाल विकास केंद्र
बांदा ः कोकण विकास संस्थेच्या वतीने पनवेल येथील आदई गावात युनिकॉर्न बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले. या आश्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग खांडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी विजया वाळके या कार्यकर्तीच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीची पूजा करून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करत राहण्याची शपथ घेण्यात आली. दीनदुबळ्या, निराधार बालकांच्या संगोपनासाठी कोकण संस्थेच्या माध्यमातून या केंद्राची सुरुवात केली असून, येथे ३० मुलांचे संगोपन केले जाणार आहे. या आश्रमातील प्रत्येक मुलाच्या आरोग्य, शिक्षणासह त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संस्था पुढाकार घेणार आहे, अशी माहिती संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी दिली. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक सूरज कदम, प्रीती पांगे, साक्षी पोटे, योगिता निजामकर, संतोष दोखे, कोमल कांबळे, सलीना बुटेलो, सुनंदा मोरे, हर्षला अमूप, सुजित कदम, रोशन राणे, किशोर नाईक, श्वेता चोरगे आणि मुले उपस्थित होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com