व्यापारी पतसंस्थेला २२ लाखांचा नफा

व्यापारी पतसंस्थेला २२ लाखांचा नफा

24938
मालवण ः व्यापारी पतसंस्थेच्या सर्वोत्कृष्ट कर्जदार, ठेवीदार, सेवाकर्मी, अल्पबचत प्रतिनिधी यांना गौरविण्यात आले.

व्यापारी पतसंस्थेला २२ लाखांचा नफा

नितीन वाळके; कट्टा येथील सभेत माहिती

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ ः एकविसाव्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या, व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी स्थापन केलेल्या व्यापारी पतसंस्थेने यंदा २२ लाख रुपयांहून अधिक नफा मिळविला आहे. सभासदांना १० टक्के लाभांश दिला जात आहे. सलग १८ वर्षे चोख आणि पारदर्शी व्यवहाराने ऑडीट वर्ग ‘अ’ मिळविणाऱ्या पतसंस्थेचा व्यवसाय वृद्धी दर प्रतिवर्षी १० टक्के आहे. यंदाच्या वर्षापासून हा दर २० टक्केवर नेऊन पुढील पाच वर्षांत १०० कोटींचा एकत्रित व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून संचालक मंडळ कामाला लागले आहे, अशी माहिती व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके यांनी दिली.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यापाऱ्याच्या दुकानापर्यंत व्यक्तीगत वित्तीय सेवा, व्यापार स्नेही अशा पतपुरवठ्याच्या अभिनव व सुलभ कर्ज योजना, १० टक्क्याहूनही अधिक परताव्याच्या ठेव योजना आणि उच्च दर्जाची ग्राहक सेवा अशा चतुःसुत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे हे उद्दीष्ट गाठण्यात यशस्वी होऊ व सर्व व्यापारी सभासदांनी आजवर संस्थेवर दाखविलेला विश्वासास पात्र ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, असा निर्धार श्री. वाळके यांनी व्यक्त केला.
व्यापारी पतसंस्थेची २१ वी वार्षिक अधिमंडळ सभा कट्टा येथे झाली. या प्रसंगी २०२२-२३ साठीचे म्हणून सर्वोत्कृष्ट कर्जदार-चंद्रकांत चमणकर (वेंगुर्ले), सर्वोत्कृष्ट ठेवीदार-नागेश मसुरकर (ओरोस), सर्वोत्कृष्ट अल्प बचत प्रतिनिधी-रितेश रजपूत (कणकवली) व सर्वोत्कृष्ट सेवाकर्मी- पूजा कुडाळकर यांना सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर उपाध्यक्ष विद्याप्रसाद बांदेकर, संचालक अनिल सौदागर, प्रकाश वाळके, अरविंद नेवाळकर, सागर शिरसाट, महेश नार्वेकर, ॲड.नंदन वेंगुर्लेकर, विनीता आंबेरकर, ॲड.प्रज्ञा खोत, राजू जठार, महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, संस्थेचे व्यवस्थापक काका सावंत व सल्लागार अमित पंडीत उपस्थित होते. संस्थेने केलेल्या प्रगतीबद्दल व संचालक मंडळ करीत असलेल्या कामगिरीबद्दल सर्वच उपस्थित सदस्यांनी समाधान व्यक्त केले. या सभेस विलास कोरगावकर, नितीन तायशेटे, राजन नाईक, प्रविण शेवडे, जयराम डिगसकर, श्रीराम शिरसाट, बंडू खोत, दिपक भोगले, अशोक गाड, संतोष कुडाळकर, दिपक बेलवलकर, प्रमोद ओरसकर, रत्नाकर कदम, योगेश कदम, संजय भोगटे, संजय लोके, सुरेंद्र नारकर, तेजस आंबेकर, निशिकांत डंबे, चेतन अंधारी, महादेव परब, रवि गवंडी, हेमंत सातार्डेकर, सिताराम कराळे, प्रसाद वराडकर, जगन्नाथ वालावलकर, अवधुत नेवाळकर व अन्य सभासद व्यापारी व सहव्यवस्थापक प्रज्ञा सरंबळकर, प्रियांका तोटकेकर, ऋतुजा सामंत, वैशाली परब, गोपाळ नाईक, रविंद्र पावसकर, शशांक माने, सुयश गोसावी, राजेंद्र खोत आदी उपस्थित होते. व्यवस्थापक काका सावंत यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com