मावळमध्ये २१ महिलांना शिलाई मशिन

मावळमध्ये २१ महिलांना शिलाई मशिन

24941
मावळ ः येथे प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.

मावळमध्ये २१ महिलांना शिलाई मशिन
बांदा ः कोकण कला व शिक्षण विकास संस्थेमार्फत मावळ (जि. पुणे) तालुक्यात २१ गरजू महिलांना सिगेट कंपनीच्या माध्यमातून शिलाई स्कूल प्रकल्पांतर्गत दोन महिने टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंग, प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास, खरेदी-विक्री कौशल्य, स्वयंरोजगार आणि व्यवसाय वृद्धी आदी प्रशिक्षणांसह शिलाई मशिन व कीट उपलब्ध करून देण्यात आले. कामशेत येथे रिंकू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्‌घाटन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी बिसलरी कंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक विठ्ठल कुंभार, कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, प्रकल्प व्यवस्थापक बापू माने, प्रीती पांगे, साक्षी पोटे, बिना अहिरे, शिक्षिका वृंदा बालगुडे आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोकण संस्थेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे सोने करून कुटुंबासह समाजाचा आणि तालुक्याच्या विकासात योगदान देऊ, असा विश्वास लाभार्थी महिलांनी व्यक्त केला. बापू माने यांनी आभार मानले.
...................
‘स्वराज्य’ पथकातर्फे ढोल वादन प्रशिक्षण
मालवण ः मालवणसह संपूर्ण जिल्ह्यात नावाजलेल्या स्वराज्य ढोल पथकामार्फत गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मालवणात विनामूल्य ढोल वादन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी महिलांसह पुरुषांनाही ढोल वादन शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पथकाच्या शिल्पा खोत यांनी दिली. स्वराज्य ढोल पथकाचा जिल्ह्यात नावलौकिक आहे. अनेक महिलांना या ढोल पथकामार्फत स्वावलंबनाचे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महिला आणि पुरुषांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय पथकाने घेतला आहे. इच्छुकांनी शिल्पा खोत, निकिता तोडणकर, ज्योती तोडणकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com