दापोली किनाऱ्यावर सापडला 10 कोटीचा चरस

दापोली किनाऱ्यावर सापडला 10 कोटीचा चरस

अमली पदार्थ चित्र टाका


दापोली किनाऱ्यावर
१० कोटींचे चरस हस्तगत
गुजरात कनेक्शन; २५७.६४५ किलोच्या बॅगा जप्त
रत्नागिरी, ता. २१ ः दापोली समुद्रकिनाऱ्यावर आठवडाभरात सुमारे २५७.६४५ किलो चरससदृश अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे १० कोटी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात या अमली पदार्थांच्या बॅगा आल्या कुठून, याची चौकशी सुरू आहे. गुजरात एटीएसशी संपर्क साधला असता तिथेही अशा बॅगा सापडल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
अतिशय संवेदनशील असलेल्या अमली पदार्थाचा वारंवार मिळणारा बेवारस साठा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दापोली समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या बॅगा सापडल्या आहेत. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. २४ ऑगस्टपासून या किनाऱ्यावर या अमली पदार्थांच्या बॅगा सापडत आहेत. आतापर्यंत पोलिसांना किनाऱ्यावर २६ किलो चरससदृश अमली पदार्थांची पाकिटे सापडली आहेत. कस्टम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनाही २५० किलो चरसची पाकिटे जप्त केल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.
याबाबत पोलिसानी फॉरेन्सिक लॅबच्या टीमकडून त्याची तपासणी केली असता ते चरससदृश अमली पदार्थ असल्याचे पुढे आले आहे. दापोली समुद्रकिनाऱ्यावर १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत सुमारे २५७.६४५ किलो चरसचा साठा जप्त करण्यात आला. याची किंमत सुमारे ९ कोटी ८८ लाख १७ हजार ६०० रुपये इतकी आहे. पोलिसांना सापडलेल्या या चरसची किंमत आणखी जास्त असू शकते. कारण जप्त केलेल्या मालाची किंमत काढताना औषध निर्मितीसाठी लागणारी किंमत गृहीत धरली जाते; पण अमली पदार्थ म्हणून त्याची किंमत जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. किनाऱ्यावर मिळणाऱ्या या अमली पदार्थांच्या बॅगांबाबत पोलिसदलाने गुजरात एटीएसशी संपर्क साधला आहे. तिथेही अशा प्रकारची पाकिटे मिळाली आहेत. त्यामुळे हा नेमका काय प्रकार आहे, हे लवकरच पुढे येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com