रस्टिक आर्टसच्या लाकडी कलात्मक वस्तू प्रदर्शनाला प्रारंभ

रस्टिक आर्टसच्या लाकडी कलात्मक वस्तू प्रदर्शनाला प्रारंभ

३० (पान २ साठी)


-rat१५p२७.jpg-
२३M३०८१५
रत्नागिरी ः रस्टिक आर्टसच्या लाकडी कलात्मक वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन करताना डॉ. श्रीधर ठाकूर. सोबत राहुल पंडित, योगेश मुळे, नितीन करकरे, शिल्पा करकरे.
---------
‘रस्टिक आर्टस’चे लाकडी वस्तू प्रदर्शन सुरू

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : आजकाल सर्वच प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल दिसतो; परंतु याला छेद देत संगमेश्वर येथील रस्टिक आर्टसने घरात वापरायच्या अनेक वस्तू लाकडी बनवण्याचा ट्रेंड आणला आहे. या कलात्मक वस्तूंचे आगळेवेगळे प्रदर्शन मारूती मंदिर येथील शर्वाणी हॉलमध्ये आजपासून सुरू झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या वेळी माजी नगराध्यक्ष राहुल पंडित उपस्थित होते. रस्टिक आर्टसच्या शिल्पा आणि नितीन करकरे यांनी सर्वांचे स्वागत केले. या प्रसंगी कातळशिल्प शोधकर्ते सुधीर रिसबूड, कॉम्प्युटर कन्सेप्टचे योगेश मुळे, केबीबीएफचे मावळणकर, मुग्धा ठाकुरदेसाई, योगिनी मुळ्ये, हॉटेल व्यावसायिक भणसारी आदी उपस्थित होते. कोकणी कारागिरांनी हस्तकलेतून साकारलेल्या अनेक प्रकारच्या लाकडी, मातीच्या वस्तू प्रदर्शनात मांडल्या आहेत. शिल्पा आणि नितीन करकरे गावच्या ओढीने शहरातील व्यवसाय सोडून कोकणात परत आले. त्यांनी तुरळ येथेच ''रस्टिक हॉलिडे'' हा होम स्टे सुरू केला. त्यानंतर आसपासच्या कारागिरांशी परिचय झाला व त्यातून या दाम्पत्याने कोकणी हस्तकलेच्या लाकडी वस्तू बनवण्याचे ठरवले. त्यानंतर ''रस्टिक आर्ट्स'' हे कलादालन सुरू केले. या प्रदर्शनात लाकडी खुर्च्या, टेबल्स, झोपाळे, तीन पायांचे स्टूल, फोल्डिंगच्या खुर्च्या, चमचे, विळी, की-होल्डर, पेनस्टॅंड, टिशू पेपर बॉक्स, मातीची भांडी अशा अनेक वस्तू आहेत. हे प्रदर्शन रविवार (ता.१७) सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com