चिपळूण : टेरव देवस्थानचे होणार सुशोभीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण : टेरव देवस्थानचे होणार सुशोभीकरण
चिपळूण : टेरव देवस्थानचे होणार सुशोभीकरण

चिपळूण : टेरव देवस्थानचे होणार सुशोभीकरण

sakal_logo
By

टेरव देवस्थानचे होणार सुशोभीकरण

प्रादेशिक पर्यटन विकास ; ७८ लाख १२ हजार मंजूर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ : तालुक्यातील टेरव देवस्थान परिसराचे शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ७८ लाख १२ हजार रुपये मंजूर केले आहे. आमदार शेखर निकम यांनी टेरव देवस्थान येथील विकासकामांसाठी निधी मंजूर करून घेतला आहे.
चिपळूणपासून ३ किमी अंतरावर टेरवच्या भवानीमाता मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. येथून ७ किमी अंतरावर निसर्गरम्य परिसरात भवानी मातेचे मंदिर आहे. मंदिरात उत्तम शिल्पकलाकृती पाहता येते. मंदिरात भवानीमाता आणि गावदेवी वाघजाई यांच्यासह नवदुर्गेच्या आकर्षक मूर्ती आहेत. शासनाच्या क वर्ग पर्यटनामध्ये या मंदिराचा समावेश होतो. नवसाला पावणारे देवस्थान असे या देवस्थानची ओळख आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील भक्त येथील देवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. भवानी वाघजाई देवीचा नवरात्र उत्सव येथे मोठ्या थाटात साजरा केला जातो. शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२२-२३ अंतर्गत श्री जयभवानी वाघजाई मंदिर टेरव येथील पर्यटन विषयक कामांसाठी ७८ लाख १२ हजार इतक्या रक्कमेला पर्यटन विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. शासन निर्णयान्वये १५ लाख ६२ हजार इतका निधी वितरित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रादेशिक पर्यटन योजनेला गती देण्यासाठी मंत्रालयात बैठक घेतली आणि काही कामांना मंजुरी दिली. त्या कामांचे प्रस्ताव तातडीने पाठवण्याची सूचना जिल्हाधिकारी यांना केली आहे. त्यामुळे टेरव येथील देवस्थान परिसराच्या सुशोभीकरण करण्यासाठी मंजूर झालेला निधी उर्वरित निधी प्राप्त होणार आहे.