अजित पवार सत्तेबाबत नाराज

अजित पवार सत्तेबाबत नाराज
Published on

35745
वैभव नाईक

अजित पवार सत्तेबाबत नाराज

आमदार वैभव नाईक ः दसरा मेळावा शिवतीर्थावरच

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः अजित पवार हे सरकार स्थापन होण्यापूर्वी आमच्याबरोबर होते. त्यावेळी भाजप त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत होते. भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री पद दिले; मात्र आज अजितदादांना आपण चुकलो, हे समजले आहे. त्यामुळे अजितदादा सत्तेबाबत नाराज आहेत, हे कालच्या दोन बैठकांमध्ये दिसून आले, असा दावा आमदार वैभव नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दसरा मेळावा १९६८ पासून शिवतीर्थावरच होतो, तो तिथेच होईल, असेही ते म्हणाले.
आमदार नाईक म्हणाले, ‘‘दसरा मेळाव्यात वर्षभरात कार्यकर्त्यांची उद्दिष्टे, काम याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतात. आता शिंदे गट मोदी-शहांना नेते मानतो. मागील वर्षी शिंदे यांच्या भाषणावेळी लोक उठून गेले होते. यावेळी सुद्धा तेच होईल. त्यामुळे नीतिमत्ता असेल, तर शिंदे गट यावेळी दसरा मेळावा घेणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुग्णालयात रुग्णांसाठी पुरेसा औषधसाठा नाही. येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना दोन-दोन महिने वेतन मिळत नाही. गर्भवती महिलांना आवश्यक असणारी औषधे उपलब्ध नाहीत. राज्याने नुकताच ''शासन आपल्या दारी'' हा कार्यक्रम राबविला; पण यासाठी जिल्हा नियोजनमधून १ कोटीचा निधी घेतला. हाच निधी आरोग्यासाठी वापरता आला असता." दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे उसनवारीत आणणे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. इतिहास संशोधकांच्या मतानुसार छत्रपतींची ही वाघनखे नाहीत, असे एका प्रश्नाला उत्तर देताना आमदार नाईक म्हणाले.
.............
चौकट
उद्योगपती सामंत शिवसेनेच्या वाटेवर
किरण सामंत हे चतुर उद्योगपती, राजकीय पदाधिकारी आहेत. पहिले ते राष्ट्रवादीत, नंतर शिवसेनेत आणि आता शिंदे गटात आहेत. आता त्यांना उद्धव ठाकरे यांचे सरकार येणार असल्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे ते ठाकरे शिवसेनेच्या वाटेवर आहेत, असे यावेळी आमदार नाईक यांनी सांगीतले.
................
चौकट
विनायक राऊतांनाच पुन्हा खासदारकी
रत्नागिरी-सिंधुदुर्गची खासदारकी उमेदवारी विनायक राऊत यांनाच मिळणार आहे. दोन्ही टर्ममध्ये त्यांनी चांगले काम केले आहे. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एकमुखी मागणी केली असून, येत्या रविवारी ''मातोश्री''वर आयोजित बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल, असे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The programme combined cultural traditions with a strong message of tree plantation and environmental protection.
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The buses were provided following continuous efforts by MLA Rajan Naik to strengthen public transport services in the region.
Ajit Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com