चिपळूण - संक्षिप्त

चिपळूण - संक्षिप्त

कुशिवडे शिगवणवाडी शाळेला खुर्च्या भेट
चिपळूण : जिल्हा परिषद शाळा कुशिवडे शिगवणवाडी शाळेला लायन्स क्लबचे सचिव सतीश सावर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब सावर्डे यांच्यावतीने १५ खुर्च्या वस्तुरूप देणगी स्वरूपात देण्यात आल्या आहेत. नांदगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष भुवड, लायन्स क्लबचे अध्यक्ष एम. जे. एफ ला. डॉ. नीलेश पाटील, सचिव सतीश सावर्डेकर, खजिनदार अरविंद भंडारी आदी उपस्थित होते. सुनील शिगवण आणि मुख्याध्यापक शिवडे यांनी देणगीबद्दल आभार मानले. लायन्स क्लब सावर्डे यांच्यावतीने शाळेतील विद्यार्थी रक्तगट तपासणी आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. या पुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन अध्यक्ष डॉ. नीलेश पाटील यांनी दिले. डॉ. कृष्णकांत पाटील, अरविंद भंडारी तसेच अध्यक्ष डॉ. पाटील यांनी लायन्स क्लबबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन प्रवीण शिवडे यांनी केले. सतीश सावर्डेकर यांनी आभार मानले.


rat10p14.jpg ः KOP23M36944 सावर्डे - सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे स्वागत करताना आमदार शेखर निकम.

मंत्री रवींद्र चव्हाण यांची
सह्याद्री शिक्षणसंस्थेला भेट
चिपळूण ः राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेमधील विविध शैक्षणिक दालनाची माहिती घेतली. शिक्षणमहर्षी स्व. गोविंदराव निकम यांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. संस्थेचा परिसर स्वच्छता, उच्च शैक्षणिक दर्जा आणि अनुभवी शिक्षकांशी चर्चा केली. प्रथमच संस्थेत आलेल्या चव्हाण यांचे संस्थेतर्फे स्वागत करण्यात आले. स्व. गोविंदराव निकम यांनी उभी केलेली आणि आमदार शेखर निकम यांनी पुढे आणलेली ही संस्था पाहून अभिमान वाटला. माझ्या कोकणात अशी संस्था आहे, याचाच आनंद सह्याद्री बघून झाला आहे, असे चव्हाण यांनी सांगून ही संस्था आपली आहे. या संस्थेसाठी माझे कायम सहकार्य राहणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी पूजा निकम, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार डॉ. विनय नातू उपस्थित होते.


फोटो
rat10p16.jpg ःKOP23M36946 दमण : दापोली अर्बन अध्यक्ष व संचालक पुरस्कार स्वीकारताना.

दापोली अर्बन बँकेला बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार
दाभोळ ः कोल्हापूर येथील अविज् पब्लिकेशन व गॅलेक्सी इनमा यांचा बँको ब्ल्यू रिबन हा बेस्ट बँक पुरस्कार दापोली अर्बन बँकेला दमण येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रिझर्व्ह बँकेचे निवृत्त सी. जी. एम., पी. के. अरोरा यांच्या हस्ते व बँकोचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे यांच्या उपस्थितीत दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर यांनी स्वीकारला. या वेळी बँकेचे संचालक एम. आर. शेट्ये, अनवर रखांगे, प्रभाकर शिंदे, संदीप दिवेकर, अशोक जाधव, आशिष मेहता, दत्तात्रय बिवलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी थोरात यांच्या समवेत स्वीकारला. दापोली अर्बन बँकेने अध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत दर्जेदार सेवा आणि कामकाजातील पारदर्शकता या द्वारे बँकेची सांपत्तिक स्थिती मजबूत ठेवत ग्राहकांचा व सभासदांचा विश्वास संपादन केला असून बँकेच्या चौफेर प्रगतीला प्रोत्साहन देणारा हा क्षण ठरला आहे.
-------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com