सिंधुदुर्गनगरीतील बैठकीत
नवरात्रोत्सवाबाबत सूचना

सिंधुदुर्गनगरीतील बैठकीत नवरात्रोत्सवाबाबत सूचना

37512
सिंधुदुर्गनगरी : बैठकीला उपस्थित पोलिस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल व पोलिस अधिकारी.

सिंधुदुर्गनगरीतील बैठकीत
नवरात्रोत्सवाबाबत सूचना
ओरोस ः आगामी नवरात्रोत्सव व‌‌‌ धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी योग्य काळजी घ्या, असे आवाहन पोलिस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाणे येथे पोलिसपाटील, नवरात्रोत्सव मंडळ कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात नुकतीच ही बैठक झाली. यावेळी पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या पोलिसपाटलांसह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस महासंचालकांच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे, महिलांबाबत गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेणे, ध्वनिप्रदूषण कायद्याचे पालन यावर चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष कोल्हटकर, वाचक पोलिस अधीक्षक कार्यालयाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव, उपनिरीक्षक राजेंद्र दळवी, उपनिरीक्षक नितीन कदम आदींसह नवरात्र मंडळांचे आयोजक, अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.
..............
‘पदवीधर’ नोंदणीसाठी देवगडमध्ये आवाहन
देवगड ः कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू आहे. यासाठी १ नोव्हेंबर २०२० पूर्वी पदवी शिक्षण पूर्ण झालेली व्यक्ती मतदार म्हणून नावनोंदणी करू शकते. त्यामुळे तालुक्यातील अशा व्यक्तींनी पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन येथील तहसीलदार रमेश पवार यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com