स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे झाले 45 हजार सभासद

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे झाले 45 हजार सभासद

१२ (पान २ साठी)

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे
४५ हजार सभासद ः ॲड पटवर्धन

रत्नागिरी, ता. १३ : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ४५ हजार झाली आहे. या सभासदांनी उभी केलेली भांडवलरूपी सहकार ताकद स्पर्धेच्या भांडवलशाही अर्थजगतातही अग्रस्थानी टिकेल, अशी माहिती संस्थाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
सहकार कायद्यातील प्रावधानाप्रमाणे सहकारी संस्थेला सभासद असलेल्या व्यक्तीशीच व्यवहार करता येतात. नाममात्र सभासदांबरोबर व्यवहार करण्यावर खूप बंधन आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्जदार, प्रत्येक ठेवीदार, प्रत्येक पिग्मीदार हा संस्थेचा भागधारक सभासद असणे अनिवार्य असते. केवळ ३०० सभासद जमवून सुरू झालेल्या स्वामी स्वरूपानंदची सभासद संख्या ४५ हजार पार होते. आज ठेवी २८८ कोटी, कर्जे २०२ कोटी, गुंतवणूक १३२ कोटी, स्वनिधी ४२ कोटी, सीआरएआर २७ टक्के, सीडी रेशो ६०.८४ टक्के, NPA शून्य टक्के, खेळते भांडवल ३४४ कोटी, ४७ लाख असे भक्कम अर्थकारण आहे.
या सभासदांमध्ये ४८ टक्के महिलांचा समावेश असून, ५० ते ७० वयोगटातील ६५ टक्के तर १८ ते २५ वर्ष वयोगटातील ९ टक्के, ३० ते ५० वयोगटातील २६ टक्के नागरिक संस्थेशी आपुलकीने, विश्वासाने संलग्न आहेत. ३४ वर्षे पतसंस्थेचे काम करत असताना उत्तम अर्थकारणाबरोबर ४५ हजार नागरिकांना सहकारसुत्रात गुंफता आले आणि रचनात्मक ताकद उभी करता आली हेच मोठे यश म्हणावे लागेल, अशी भावनिक प्रतिक्रिया ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com