वडाचापाट हायस्कूलमध्ये वस्तू प्रदर्शन

वडाचापाट हायस्कूलमध्ये वस्तू प्रदर्शन

37556
वडाचापाट ः शांतादुर्गा हायस्कूलला कलर प्रिंटर प्रदान करताना माहीम रोटरी क्लबचे पदाधिकारी.


अभियांत्रिकी, शेती, ऊर्जा प्रतिकृतींचे कौतुक

वडाचापाट हायस्कूलमध्ये वस्तू प्रदर्शन, विद्यार्थ्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १३ : तालुक्यातील श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथे व्यवसाय अभ्यासक्रमअंतर्गत आयोजित विविध वस्तू प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभियांत्रिकी, शेती, पशुपालन, ऊर्जा पर्यावरण आदी विविध वस्तूंचे मान्यवरांनी कौतुक केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या रोटरी क्लब मुंबई माहीमच्या अध्यक्षा प्रज्ञा सबनीस, शैला रेगे, उमा सहस्त्रबुद्धे, धनंजय पटवर्धन, किशोर परुळेकर, डॉ. सुप्रिया सापळे, प्रदीप पाटोळे, सीमा पाटोळे, वृषाली कोल्हटकर, सायली चव्हाण, सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे, रश्मी पाटील, दिलीप नलावडे आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनात अभियांत्रिकी विभागांतर्गत नारळ सोलणी यंत्र, चप्पल स्टॅन्ड, सॅनिटायझर स्टॅन्ड, शेती पशुपालन विभागांतर्गत गांडूळ खत, विविध कीटकनाशके, गृह आरोग्य विभागांतर्गत वेगवेगळ्या पाककृती व शोभेच्या वस्तू, ऊर्जा पर्यावरण विभागांतर्गत ताक घुसळणी यंत्र आदी विविध प्रतिकृती मांडण्यात आले. विद्यार्थ्यांना केशव भोगले, जगन्नाथ आंगणे, हर्षदा पाटकर, कविता माडये यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र टॅलेंट सर्च प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यात तन्मय राणे, गायत्री शिंदे, विराज परब, विराज मांजरेकर, प्रणित पालव यांचा प्रमुख पाहुण्या सबनीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी प्रशालेची प्रगती आणि वाटचालीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन शिक्षिका प्रतिभा केळुसकर यांनी केले. प्रीती सनये यांनी आभार मानले. यावेळी शिक्षिका पूजा कुडाळकर, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
.................
चौकट
माहीम ‘रोटरी’तर्फे हायस्कूलला प्रिंटर
शाळेत होणाऱ्या वस्तू प्रदर्शन व इतर उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. यातून विद्यार्थ्यांची उद्योजकतेच्या दृष्टीने वाटचाल होते, असे गौरवोद्गार यावेळी रोटरी क्लब मुंबई-माहीमच्या अध्यक्षा प्रज्ञा सबनीस यांनी काढून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी प्रशालेस माहीम रोटरी क्लबमार्फत कलर प्रिंटर व लतिका सावंत या विद्यार्थिनीस सायकल प्रदान करण्यात आली. संस्थाध्यक्ष विजय पाटकर, साबाजी करलकर, सुधीर हेरेकर यांनी रोटरी क्लबचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com