रत्नागिरी-ठाकरे गटाचे आरोप हस्यास्पद

रत्नागिरी-ठाकरे गटाचे आरोप हस्यास्पद

ठाकरे गटाचे आरोप हस्यास्पद

बाबू म्हाप ; कोणाच्या दहशतीमुळे डॉक्टर येत नाहीत याचा विचार करा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली पत्रकार परिषद हास्यास्पद आणि सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी होती. रत्नागिरीकरांची ४० वर्षांची मागणी असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीत झाले. त्याबद्दल पालकमंत्री सामंतांचे त्यांनी जाहीर कौतुक करण्याचा मोठेपणा दाखवायची गरज होती. राहिली जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्न तर त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच. परंतु कोणाच्या दहशतीमुळे डॉक्टर घाबरुन येत नव्हते, याचा विचार बोलणाऱ्यांनी करायला हवा होता, असा प्रतिटोला शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित आणि तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांनी ठाकरे गटाला लगावला.
जयस्तंभ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शहरप्रमुख बिपिन बंदरकर, माजी नगरसेवक निमेश नायर, ज्येष्ठ नेते राजन शेट्ये, अभिजित दुडये आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती सर्वांनाच ज्ञात आहे. रत्नागिरीचीच नव्हे तर राज्यातील सर्व रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी मंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न आहेत. जिल्हा रुग्णालयावर सर्वसामान्यांचा विश्वास आहे, म्हणूनच मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहेत. साथीच्या रोगामुळे रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था नसेल तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. परंतु आपणही सत्तेत होता, तेव्हा का नाही सुटले वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रश्न?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीत यावे, यासाठी महिला रुग्णालयाचा अध्यादेशामध्ये दुरुस्ती करण्यात आली. मेडिकल कॉलेजला जागा उपलब्ध होईपर्यंत या इमारतीमध्ये मेडिकल कॉलेज करण्यात आले. विरोधकांकडे मुद्दे नसल्याने त्यांनी ही हास्यास्पद पत्रकार परिषद घेतली, असे बाबू म्हाप म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com